इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी येथील डीकेटीई संस्थेत कार्यतरत असणारे किरण विलास लंगोटे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना वसुंधरा सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय समाजरत्न ग्लोबल पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण एका शानदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
येथील डीकेटीई संस्थेत कार्यरत असणारे किरण लंगोटे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या संकल्पनेतून इचलकरंजीमध्ये दिनांक १५ व १६ मार्च रोजी जन्मलेल्या मुलींच्या नांवे स्व. इंदुमती आवाडे ही कन्यारत्न ठेव योजना सुरु केली आहे. यामध्ये आज अखेर २० हून अधिक मुलींच्या नांवे ठेव ठेवण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदत केली आहे. तसेच गेली १५ वर्षे त्यांनी गावभाग येथील जगताप तालिम मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम सुरु ठेवलेआहे. त्यांनी आजअखेर निरपेक्ष भावनेने केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेूवन त्यांना वसुंधरा सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय समाजरत्न ग्लोबल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मागील २००५, २०१९ व २०२१ या तिन्ही महापुराच्या काळात त्यांनी अगदी सेवाभावी वृत्तीने मदतीचे कार्य केले आहे. तसेच नदी घाट स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण या सर्व कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.
या पुरस्काराबद्दल त्यांचे सहकार महर्षी व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, डीकेटीईच्या सचिव डॉ. सपना आवाडे, डॉ. राहूल आवाडे, डीकेटीईच्या डायरेक्टर डॉ. सौ एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु.जे. पाटील व विविध मान्यवरांनी अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.