You are currently viewing नाईट कॉलेजमध्ये ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात 

नाईट कॉलेजमध्ये ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात 

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

इचलकरंजी येथील देशभक्त बा.भा. खंजीरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स मध्ये स्टाफ अकॅडमी व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस रिसोर्स पर्सन म्हणून प्रा. अभिजित पाटील उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 अंतर्गत विविध विद्यार्थिकेंद्री बदल करण्यात आले आहेत. अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट हा धोरणातील अत्यंत महत्त्वाचा पैलू असून विद्यार्थ्याने शिक्षण घेत असताना कमावलेल्या क्षमतांची नोंदणी या बँकद्वारे होणार आहे. भविष्यात या माध्यमातूनच विद्यार्थ्यांची क्षमता ओळख होणार असून त्यासाठी आपले खाते योग्य पद्धतीने निर्माण करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रा. अभिजित पाटील यांनी केले. दरम्यान कार्यशाळेत प्रा. पाटील यांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन च्या माध्यमातून एबीसी आयडी काढण्याचे विविध प्रकार सांगितले. तसेच उपस्थित प्राध्यापकांचे प्रायोगिक तत्त्वावर एबीसी आयडी काढण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. पुरंधर नारे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक डॉ. बि. यु. तुपे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.रविकिरण कोरे यांनी केले. आभार प्रा. एफ. एन. पटेल यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा.सौरभ पाटणकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा