*कासार्डे विद्यालयाच्या सन.१९९८/९९ बॅचकडून ५६ धनादेश*
तळेरे : प्रतिनिधी
कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सन- १९९८/९९ इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या भौतिक सुविधेला हातभार लावण्यासाठी ५६ हजाराचा धनादेश स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे ,प्र.मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर,
प्र.पर्यवेक्षिका सौ.बी.बी. बिसुरे यांच्याकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी किशोर कुडतरकर,सहदेव मस्के, रवींद्र पाताडे, दिपक गायकवाड,प्रभाकर नकाशे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सन.१९९८/९९ बॅचचे स्थानिक प्रतिनिधी अभिजित शेट्ये, रमेश पवार, प्रदीप कदम व संतोष पेडणेकर उपस्थित होते.या बॅचमधील अॅड. मिलिंद नकाशे, प्रल्हाद पाताडे,राहुल दाते,समीर तळेकर व प्रिया ढेकणे यांच्या माध्यमातून सुमारे ३८ माजी विद्यार्थ्यांनी इच्छाशक्तीनुसार खारीचा वाटा उचलत सुमारे ५६ हजाराची शाळेला मदत केली आहे.
यापुर्वीही या बॅचमार्फत शाळेला साउंड सिस्टीम आणि ग्रीन बोर्ड भेट म्हणून दिली आहे.
तसेच गरजेनुसार पुढेही शाळेला मदत करण्याची इच्छा बॅच प्रतिनिधीनी व्यक्त केली.
फोटो:५/८/२०२३
कासार्डे: इयत्ता दहावी सन.१९९८/९९चे माजी विद्यार्थी प्रशालेला धनादेश संस्था पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांना सुपूर्द करताना सोबत अन्य मान्यवर