कोकण संस्थेचा पुढाकार
सावंतवाडी
सावंतवाडीत ‘वन रुपी क्लिनिक’चा शुभारंभ ६ आँगस्ट २३ रोजी सेवाभावी स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या संकल्पनेतून आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या पुढाकारातून होत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला फक्त एक रुपयात आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील अनेक डॉक्टर या क्लिनिक मध्ये सामाजिक भावनेतून काम करणार आहेत.
ज्यामध्ये कान, नाक, घसा, त्वचारोग, डायबिटीस, स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ असे वेगवेगळे डॉक्टर असणार तरी जास्तीत जास्त गरजू लोकांनी जुना शिरोडा नाका, दुर्वांकुर बिल्डिंग गाळा नंबर ९, सावंतवाडी येथे येऊन या क्लिनिकचा फायदा घ्यावा अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली.