वैभववाडी
सुप्रीम कोर्टाने काँग्रेस लीडर श्री राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांची गेलेली खासदारकी परत मिळणार आहे.. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सहाचे वातावरण आहे. त्या निमित्ताने आज वैभववाडी येथे संभाजी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
यावेळी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, सिंधुदुर्ग जिल्हा रोजगार स्वयंरोजगार अध्यक्ष गुलजार काझी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद पवार, तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर, तालुका सेक्रेटरी श्रेया मुद्रस,दिलीप नारकर, वसीम काझी, सिद्धार्थ कांबळे, असिफ बोबडे, दिलावर पाटणकर, इम्रान नाचरे, मुस्तफा रामदूल, मोहमद बोबडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते