You are currently viewing अभ्यासू, प्रयोगशील चरित्र अभिनेते जयंत सावरकर

अभ्यासू, प्रयोगशील चरित्र अभिनेते जयंत सावरकर

*अभ्यासू, प्रयोगशील चरित्र अभिनेते जयंत सावरकर*
(विषेश लेख)
*:- ॲड.रूपेश पवार*

मराठी रंगभूमीवरचा अभ्यासू, प्रयोगशील कलावंत अशी ओळख ज्यांची आहे, ते आपले आवडते अभिनेते जयंत सावरकर अगदी समाधानाने स्वर्गीय प्रवासाला निघून गेले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण अभिनय कलासृष्टीला दुःख झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षातही जयंत सावरकर कलाकार म्हणून भूमिका करत होते. आत्ताच दहा, पंधरा दिवसांपूर्वी ते आजारी होऊन आपल्यातून कसे निघून गेले. ही संभ्रमाची अवस्था सर्व नव्या, जुन्या कलाकारांची आहे. जयंत सावरकर हे सर्व निर्माते, दिग्दर्शक कलाकार यांचे लाडके अण्णा होते. त्यांनी या कलासृष्टीतील तीन पिढ्यांसोबत मिळून मिसळून काम केले होते. अभिनय कला ज्याला खऱ्या अर्थाने आत्मसात करायची असेल. तर त्याने फक्त जयंत सावरकरांच्या भूमिका बघाव्यात किंवा त्यांच्यासोबत काम करताना सहज शिकून घ्यावे. असे हे कसदार अभिनेते होते. म्हणून त्यांच्या जाण्याने नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी लवकर भरून येणार नाही. त्यांच्या नव्या भूमिका कुणालाही पाहता येणार नाहीत. असे हे जयंत सावरकर अष्टपैलू अभिनेते होते.

जयंत सावरकर यांचा जन्म गुहागर येथे ३ मे. १९३६ साली झाला. १९५४-५५ पासून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. त्यावेळी ते वीस वर्षांचे होते. ही त्यांची कारकीर्द ७३ वर्षांची होती. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपला अभिनय सोडला नाही. केशवराव दाते, मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे, विजया मेहता यांसारख्या दिग्गज दिग्दर्शक, कलाकारांसोबत सावरकरांनी काम केले आहे. जयंत सावरकरांनी आकाशवाणीवर सुरुवात करताना एक परीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांनी आकाशवाणीवर विविधांगी कार्यक्रम केले. ते शेवटपर्यंत आकाशवाणीशी जोडले गेले होते. त्याचवेळी जयंत सावरकर हे सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर्सच्या कार्याशी सलग्न होते. या लिटिल थिएटर्समधल्या बालरंगभूमीवरही ते सक्रिय होते. या नाटकातून त्यांनी काही भूमिकाही केल्या होत्या. मुंबई दूरदर्शनवर जयंत सावरकर कलाकार म्हणून काम करत असताना, त्यांना निर्माता म्हणूनही कार्यक्रमांचे संचलन करण्याची संधी मिळाली. मुंबई मराठी साहित्य संघाचे ते स्वयंसेवक होते. त्याचवेळी त्यांच्यावर नाट्य अभिनयाचे संस्कार झाले असावेत. कारण मुंबई मराठी साहित्य संघात त्या काळात विविध नाटकांची रेलचेल असायची. त्यातून अनेक कलाकार घडले, त्यात जयंत सावरकरही होते. अशा प्रकारे जयंत अण्णांनी अभिनयाचे धडे गिरवले. हे धडे गिरवत असताना त्यांनी नाटकात आणि चित्रपटात वेगवेगळ्या तऱ्हेव्हाहीक चरित्र नायकाच्या भूमिका केल्या.

जयंत सावरकरांना ‘एकच प्याला’ नाटकातून अपार लोकप्रियता मिळाली. त्यात त्यांनी तळीरामाची सुंदररित्या भुमिका निभावली होती. ‘सूर्यास्त’ या नाटकात सावरकर अण्णांनी ‘गायकवाड’ ही व्यक्तीरेखा साकारली. ती व्यक्तीरेखा पाहिल्यावर एक समीक्षक म्हणाले. फुटकळ विनोदी
कलाकाराने गायकवाडची भूमिका उत्तम केली. असे सावरकर अण्णांच्या यशाचे वर्णन झाले. याच नाटकातील सहकलाकार निळूभाऊंनी सावरकरांच्या भुमिके बद्दल पत्र लिहून आक्षेप व्यक्त केला होता पण नंतर सावरकरांचा अभिनय अनुभवल्यावर भाऊंनी त्यांचे मिठी मारुन कौतुक केले. अशारितीने जयंत सावरकर व्यवसायिक अभिनेते झाले. त्याचे हे पहिले व्यवसायिक नाटक होते. मराठी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकावर आधारित नाटकात जयंत अण्णांनी अंतू बर्वा व हरी तात्या हे चरित्र नायक हुबेहूब वठवले होते. त्यातील
अंतू बर्वा हा टिपिकल खोचक मालवणी मातारा आपल्यासमोर बसला. त्याने आपल्याला हसवले, चरित्राच्या शेवटाकडे येताना अंतर्मुख केले. लेखकाच्या कथेला, आहे तसा जिवंतपणा सावरकर यांनी आणला होता. म्हणून त्यांची ही व्यक्तिरेखा खूप गाजली. अशा सर्व अभिनय रंगछटा जयंत अण्णांनी आपल्या कलाकृतीतून सजीव केल्या. म्हणूनच जयंत सावरकरांनी मराठी चित्रपटात भूमिकांचे शतक गाठले तसेच तीसहून जास्त हिंदी चित्रपटात आपला सशक्त अभिनय दाखवून दिला.
त्याचप्रमाणे जयंत अण्णांनी रंगभूमीवर नाटकांचे जवळ जवळ अर्ध शतक ठोकले. त्यांनी घराघरातील छोट्या पडद्यावरही काही मालिका केल्या. सध्या ते ओटीपी माध्यमातून वेब सिरीज करत होते. असे हे चतुरस्त्र सदाबहार कलाकार होते.

जयंत सावरकरांच्या नाटकांचा लेखाजोखा खूप मोठा आहे. त्यातील काही नाटकांची नावे आवर्जून घेता येतील. त्यात ‘जावई माझा भला’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘टिळक आणि आगरकर’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘बेबंदशाही’, ‘लग्नाची बेडी’, ‘सूर्याची पिल्ले’ अशा नाट्य कलाकृती येतात. चित्रपटातही त्यांच्या अशाच भूमिका आहेत. त्यातील काही चित्रपट ‘तेरा मेरा साथ रहें’ (हिंदी), ‘युगपुरुष’ (हिंदी), ‘रिंगा रिंगा’ (मराठी), ‘वास्तव’ (हिंदी), ‘गडबड गोंधळ’ (मराठी), ‘धमाल बाबल्या गणप्याची’ (मराठी), असे काही चित्रपट सांगता येतील. या सर्वातून जयंतरावांचा अभिनय वर्षानुवर्ष अधिक भक्कम होत गेला. जयंत सावरकर यांचा अभिनय अभ्यासपूर्ण असायचा. त्यामुळे कोणतेही चरित्र त्यांच्याकडे आले की ते त्या व्यक्ती चरित्राला पूर्णपणे न्याय द्यायचे. कागदावरच्या निर्जीव भूमिकेला परकाया प्रवेशाने सजीवातील सजीव करून, प्रेक्षकांच्या मनात त्या चरित्राला वेगळे स्थान मिळवून द्यायचे. मग ती भूमिका छोटी असो वा मोठी असो, सावरकर वरचढ ठरायचे. असे हे अभिनय कलाकृतीचे बहुरूपी होते. त्यांची स्पर्धा कुणाशीही होत नव्हती. म्हणून असे म्हणता येईल, सावरकर अण्णा समर्थ अभिनेते होते. प्रत्येक कलाकार जयंत सावरकरांना मानायचा, त्यांचा आशीर्वाद घेऊनच घडायचा. सावरकर प्रत्येक कलाकाराला आपले मानून, त्यांना योग्य मार्गदर्शन करायचे. त्यामुळे नाट्य आणि चित्रपट कलाकृती अधिक उठावदार होयच्या. त्यामुळे सावरकर चित्रपट क्षेत्रात खूप लोकप्रिय होते.

या त्यांच्या मनमिळाऊ, आकर्षक स्वभावामुळे अनेक लोक जयंत सावरकरांना आपले मानायचे. म्हणून २०१६ ला उस्मानाबाद येथे पार पडलेल्या, ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर झाले. ही निवड पूर्णपणे बिनविरोध झाली होती. इतके अलोट प्रेम कलाकारांचे सावरकरांना लाभले होते. जयंत सावरकर यांचे बालपण फार कष्टात केले. त्यांचे वडील उसाचा रस विकून आणि खंडाने बागकाम हाती घेऊन, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. जयंत सावरकरांना हयात असलेली नव भावंडे होती. जयंत अण्णा हे सर्वात धाकटे चिरंजीव होते. त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण गुहागर मध्ये झाले. नंतर ते मुंबईत शिकले. त्यांनी शॉर्टहँड टायपिंगचा कोर्स करून त्यात प्राविण्य मिळवले. मग त्यांनी कमानी इंजीनियरिंग कंपनीत स्टेनोग्राफरची नौकरी केली. अशा खाजगी नोकऱ्या केल्यामुळे सावरकरांच्या घरात कधीच पैशाची चणचण नव्हती पण या नोकरी पेशा माणसाला कुणी फार ओळखत नव्हते.
म्हणून सावरकर आण्णा रंगभूमीकडे वळाले. त्यातून पुढे अभिनयाचा इतिहास घडला. तो आज आपण पाहतो आहे.

मित्रांनो जयंत सावरकर हे मातब्बर कलाकार होते. त्याहूनही अधिक चांगले माणूस होते. त्यांचे हे माणसातले माणूसपण आपण सर्वांनी जोपासावे. आपले कार्यक्षेत्र कुठलेही असो, तरी आपण माणसांशी जोडलेलो असतो. त्यामुळे आपण समाजातील प्रत्येक माणसाशी जुळवून घेतले पाहिजे. आपल्या नावाचे वलय कितीही मोठे असले, तरीसुद्धा आपले माणूसपण कुणीही सोडू नये. सर्वांशी मिळून मिसळून आपुलकीचा संवाद साधत लोकमन प्रेमाने जिंकून घ्यावे. हेच जयंत अण्णांनी आपल्याला सांगितले आहे. जयंत सावरकरांच्या पश्चात पत्नी, मुलगी सुषमा, सुपर्णा मुलगा कौसूब, सून शुभांगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दोन मुली, मुलगा, सून हे सर्वजण सिने नाट्य क्षेत्रातच आहेत. त्यांचा मुलगा कौसूब सुप्रसिद्ध लेखक आहे. सावरकरांना त्यांच्या प्रदीर्घ कलात्मक वाटचालीसाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात राज्य शासनाचा विष्णुदास भावे आणि प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराचा समावेश आहे. त्याचबरोबर जयंतजींना दाजी भाटवडेकर स्मृती सेवा पुरस्कार, मृदगंध पुरस्कार, मास्टर दत्ताराम स्मृती चतुरस्र कलावंत पुरस्कार असे काही महत्त्वाचे सन्मान त्यांना देण्यात आले आहेत. म्हणून ते लोकमान्य अभिनय गंधर्व वाटतात. जयंत सावरकरांच्या अशा अनेक भूमिका रसिकांच्या मनात राहतील. त्यातूनच त्यांच्या आत्म्याला पुनर्जन्म घ्यावासा वाटेल. कारण रसिकांना समोर ठेऊन जयंत सावरकरांनी अभ्यासपूर्ण भूमिका केल्या होत्या. त्यामुळे रसिकांशिवाय जयंत अण्णांना राहता येणार नाही. याच भावनेतून त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया.

अँड. रुपेश पवार
9930852165

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा