सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वाधिक डिझेल परतावा द्या
आमदार नितेश राणेंनी मत्स्य विभागाचे सहआयुक्त महेश देवरेंकडे केली मागणी
कणकवली
मच्छीमार व्यावसायिकांना डिझेल परतावापोटी चा निधी येत्या काही दिवसांत शासनाकडे जमा होणार आहे. यातील जास्तीत जास्त निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिझेल परताव्यापोटी द्यावा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी मत्स्य विभागाचे सहआयुक्त महेश देवरे यांची भेट घेत केली. मच्छीमारी हंगाम १ ऑगस्ट पासून सुरू झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. डिझेल परताव्यापोटी येणाऱ्या निधीपैकी सर्वाधिक रक्कम ही सिंधुदुर्गातील मच्छीमाराना द्यावी अशी आग्रही मागणी आमदार नितेश राणेंनी केली आहे.