You are currently viewing टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धा

टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धा

टपाल विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी

 भारतीय टपाल विभागामार्फत या वर्षी “ढाई आखर” या राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी या स्पर्धेत दि.31 ऑक्टोबर पर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक  मयुरेश कोले यांनी केले आहे.

 या स्पर्धेचे विषय “नवीन भारतासाठी डिजिटल इंडिया” असे असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. हि स्पर्धा खुली असून 18 वर्षापर्यंत व 18 वर्षावरील अशा दोन गटात होइल. पत्रलेखनाकरिता शब्द मर्यादा पोस्ट लिफाफा / साध्या लिफापयामधून आवश्यक तिकीट लावून ए-4 साईज पेपरवर जास्तीत जास्त 1000 शब्द व आंतर्देशीय पत्रावर जास्तीत जास्त 500 शब्द आहे. स्पर्धकांनी लिफाफ्यावर/ आंतर्देशीय पत्रावर आपले नाव व संपूर्ण पत्ता लिहावा तसेच लिफाफा /आंतर्देशीय पत्रावर वरील बाजूस “ढाई आखर” राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा असे नमूद करावे. स्पर्धकांनी सदरची  पत्र दि. 31  ऑक्टोबर 2023 पर्यंत चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 400001 या पत्यावर पाठवावे.

महाराष्ट्र मंडळ स्तरावरील निवडक पहिल्या 3 पत्रांना गटा प्रमाणे प्रथम क्र. 25 हजार व्दितीय क्र. 10 हजार , तृतीय  क्र. 5 हजार  ची पारितोषिके दिली जातील. मंडळ स्तरावरील तीन बक्षिसपात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठविली जाणार असून तेथे पुन्हा क्रमांक काढण्यात येतील व पहिल्या तीन क्रमाकांच्या पत्रांना अनुक्रमे 50 हजार, 25 हजार, व 10 हजार, अशी पारितोषिक दिली जातील, अधिक माहितीकरिता नजीकच्या डाकघरशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा