You are currently viewing शिवराजेश्वर मंदिराच्या दुरूस्तीच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी…

शिवराजेश्वर मंदिराच्या दुरूस्तीच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी…

मालवण

देशातील एकमेव असलेल्या मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराच्या दुरूस्तीचे व नूतनीकरणाचे काम सुरु असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मंदिरात भेट देत दर्शन घेतले तसेच सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करून घेण्याबरोबरच आवश्यक त्या सूचना आ. वैभव नाईक यांनी केल्या.

शिवराजेश्वर मंदिर दुरूस्ती व नूतनीकरणासाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत १ कोटी ५२ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर , नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी,बाळू नाटेकर, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, मंगेश सावंत, पंकज सादये, उमेश मांजरेकर, भाई कासवकर, किसन मांजरेकर, अक्षय भोसले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा