You are currently viewing शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; सेन्सेक्स ५४२ अंकांनी घसरला, निफ्टी १९,४०० च्या खाली घसरला

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; सेन्सेक्स ५४२ अंकांनी घसरला, निफ्टी १९,४०० च्या खाली घसरला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

साप्ताहिक एक्स्पायरीच्या दिवशीही शेअर बाजारात मोठी घसरण झाली. गुरुवारी, बीएसई सेन्सेक्स ५४२.१० (०.८२%) अंकांनी घसरून ६५,२४०.६८ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी १४४.९० (०.७४%) अंकांनी घसरून १९,३८१.६५ वर बंद झाला. गुरुवारी बाजाराच्या घसरणीत रियल्टी, बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील समभागांनी सर्वाधिक योगदान दिले. दुसरीकडे फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने जून २०२३ ला संपलेल्या तिमाहीत २ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १८६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला १८९ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीचा पॅट वार्षिक आधारावर ४६९ कोटी रुपयांवरून ६७४ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याचवेळी जूनच्या तिमाहीत कंपनीचा महसूल २५,४३८ कोटी रुपये होता.

आर्थिक वर्ष २०२४च्या पहिल्या तिमाहीत अदानी पॉवरचा महसूल वर्षभरात १६.८% वाढून १८,१०९ कोटी झाला. या कालावधीत कंपनीचा इबीआयटीडीए ४१.५% वाढून १०,६१८ वर पोहोचला. तर पॅट ८३.३% ने वाढून ८,७५९ कोटी झाला.

डाबर लिमिटेडने गुरुवारी नोंदवले की, जून २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीत त्यांची एकत्रित कमाई अपेक्षेनुसार होती. समीक्षाधीन तिमाहीत, एफएमसीजी कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक ५% वाढून ४६४ कोटी झाला आहे, तर ऑपरेशन्स मधील महसूल ११% वाढून ३,१३० कोटी झाला आहे.

भारतीय रुपया १५ पैशांनी घसरून ८२.७३ प्रति डॉलर विरुद्ध ८२.५८ वर बंद झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा