*रेडी उषानगर नंतर जुगाराच्या बैठकीसाठी सौदागर वाडीत उभारली शेड खाकी वर्दीचा रेड सिग्नल* *पण बैठकीला सापडेना मुहूर्त*
*संवाद मिडियाच्या बातमीचा इम्पॅक्ट*
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, उषा नगर येथे गेले अनेक दिवस जुगाराची बैठक बसविली जाते. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी त्याचबरोबर गोवा येथीलही मोठमोठे जुगारी हजर असतात. खाकी वर्दीला हाताशी धरून उषा नगर येथे राजकीय वरदहस्ताखाली जुगाराची बैठक नित्यनेमाने सुरू होती. संवाद मीडियाने बातमी दिल्यानंतर एक दोन दिवस बैठक बंद केली जायची व पुन्हा एकदा खाकी वर्दीच्या आशीर्वादाने बैठक सुरू व्हायची.
रेडी उषा नगर येथील बैठक सुरू झाली की सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संवाद मीडिया मधून तात्काळ त्या बैठकीवर प्रकाशझोत टाकला जायचा. राजकीय वरदस्त आणि खाकी वर्दीचा आशीर्वाद यामुळे रेडी उषा नगर येथील बैठक सुरूच राहिली. त्यामुळे रेडी गावची आणि उषानगर परिसराची जिल्ह्यात बदनामी होऊ लागली. परिणामी परिसराची बदनामी होत असल्याने जागरूक ग्रामस्थांनी खाकी वर्दीला धारेवर धरले. त्यामुळे उषा नगर येथील बैठक बंद केली. काही दिवस बंद असलेली बैठक रेडी, सौदागर वाडी येथे सुरू करण्यासाठी शेड उभारण्यात आली. ही शेड उभारण्यासाठी खाकी वर्दीचा पहिला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. खाकी वर्दीच्या ग्रीन सिग्नल नंतरच शेड उभारण्यासाठीचा खर्च करण्यात आला. परंतु अचानक खाकी वर्दीने परवानगी नाकारल्याने जुगाराची बैठक आयोजित करणाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे. त्यामुळे रेडी सौदागरवाडी येथे यानंतर जुगाराची बैठक रंगते की मैफिलीचा भ्रमनिराश होतो..? हे पाहणे औस्तुक्याचे आहे.