सिंधुदुर्गनगरी
माहे नोव्हेंबर 2020 मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पीएचएच रेशन कार्ड धारकांना एक किलो साखर वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रेड एस – 30 च्या 1 हजार 535 क्विंटल साखरेचा पुरवठा करण्याची मागणी जिल्हा पुरवठा विभागामार्फत करण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते हे कळवितात.