महिला अत्याचार निषेध मुकमोर्चा
मालवण
मणिपूर मध्ये जे घडले ते संपुर्ण मानवजातीलाच लांछनास्पद आहे. गेल्या काही वर्षात देशातील विविध भागात सातत्याने महिलांवर असे अत्याचार होताना दिसत आहेत, हे आपल्या लोकशाहीला तसेच भारताच्या उज्वल संस्कृतीला ही काळीमा फासणारे आहे.
सामाजिक द्वेषाच्या राजकारणात महिला या नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. त्या विषयीची चिड प्रत्येक भारतीय नागरिकास आहे. मात्र प्रत्येक वेळी आपण बोलतोच असे नाही. पण मनात मात्र सतत या सर्व वाईट गोष्टींविरूद्ध झगडा सुरू असतोच असतो.
महिलांवरील अत्याचारांचा निषेध तीव्रपणे व्हायलाच हवा. तरच घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या आणि अशा नराधमांना जाणीवपूर्वक पाठीशी घालणार्या राजकारण्यांच्या मनात जरब बसेल. शासन आणि प्रशासन ही जागे होईल. तरुण पिढीला ही होणार्या अन्यायाविरुद्ध बोलण्याचा एक आशावाद मिळेल. नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी त्वरित पावले उचलली जातील. यासाठी आपण सर्व मालवणवासीयांनी विशेषतः महिलांनी मुक्तपणे व्यक्त व्हायलाच हवं.
आपल्या प्रत्येकाच्या मनातील ही खदखद प्रकट करण्यासाठी, माता बहीणींवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सर्व मालवणवासीयां तर्फे मुकमोर्चा आयोजीत करण्यात येत आहे.
शुक्रवार दि.४ॲागष्ट२०२३ रोजी सकाळी ११.००वा.शांतीसागर मैदान देऊळवाडा ते तहसीलदार कार्यालया पर्यंत जाणाऱ्या या महिला अत्याचार विरोधी निषेध-मुकमोर्चाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतील अशी माहिती मालवण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मेघनाथ धुरी यांनी दिली