You are currently viewing आपत्कालीन परिस्थितीत मदत देण्यासाठी राष्ट्रवादीच्या बुथ कमिट्यांनी पुढाकार घ्यावा – अर्चना घारे-परब

आपत्कालीन परिस्थितीत मदत देण्यासाठी राष्ट्रवादीच्या बुथ कमिट्यांनी पुढाकार घ्यावा – अर्चना घारे-परब

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

सावंतवाडी

आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना मदत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी पदाधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, त्याचा फायदा निश्चितच येणार्‍या काळात पक्षाला नक्कीच होईल, असा विश्वास कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे यांनी केले. दरम्यान आगामी काळात होणार्‍या निवडणूका लक्षात घेता या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. सौ. घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या बुथ कमिटी आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होेत्या.
त्या म्हणाल्या, पक्षाच्या माध्यमातून आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देतो. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्यामुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या परिस्थितीत अनेकांना सहकार्य आणि मदतीची अपेक्षा असते. त्यासाठी बुथ कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी श्री. प्रविण भोसले म्हणाले, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. त्याला मजबूूत करण्यासाठी संघटना बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी बुथ कमिटीची रचना करुन कमिटी स्तरावर काम करावे. भविष्यात आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायची आहे. त्या दृष्टीने आपली वाटचाल असणे गरजेचे आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा