You are currently viewing जिल्ह्यातील चर्मकार समाजाची एकजूट कायम – वैभव नाईक

जिल्ह्यातील चर्मकार समाजाची एकजूट कायम – वैभव नाईक

जिल्ह्यातील चर्मकार समाजाची एकजूट कायम – वैभव नाईक

रोहिदास भवनासाठी आणखी निधी देण्यासाठी प्रयत्न…

ओरोस

सातत्यपूर्ण कार्यक्रम केल्याने जिल्ह्यातील चर्मकार समाजाची एकजूट कायम राहिली आहे. हा पायंडा नेहमी असाच पुढे सुरू राहावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केले. मंडळाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवनासाठी आणखी निधी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होती.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय चव्हाण, ऍड.अनिल निरवडेकर,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,उपाध्यक्ष सुरेश पवार,सुधाकर माणगावकर,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे दिलीप कानडे, समाजसेवक गणेश जाधव,संजय चव्हाण,रविकिशोर चव्हाण,प्रदीप पवार,माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण,नंदन वेंगुर्लेकर,के.टी. चव्हाण,श्रीराम चव्हाण,राजन वालावलकर,तालुकाध्यक्ष सर्वश्री गणेश म्हापणकर, मनोहर सरमळकर,हरेश चव्हाण,महानंद चव्हाण,रमेश चव्हाण,सहदेव शिरोडकर,बाबनी केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजातील प्रत्येक तालुक्यातून प्रथम तीन आलेल्या इ.दहावी ,बारावी,पदवीधर तसेच सर्व शिष्यवृत्ती धारक,नवोदय विद्यालय निवड,विशेष परीक्षा उत्तीर्ण, प्राविण्य मिळविणारे विदयार्थी तसेच विविध पुरस्कारप्राप्त व संस्था अगर शासकीय समित्यांवर निवड झालेल्या समाज बांधवांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच संत रविदास समाज भूषण पुरस्कार कुडाळ मधून सुरेश पवार, मधुकर चव्हाण यांना सावंतवाडीतून बाबुराव चव्हाण, सदानंद चव्हाण, मालवण मधून विजय पाताडे, मुरारी जांभळे, कणकवली मधून अनिल चव्हाण,दत्ताराम जाधव, देवगड मधून प्रभाकर दहिबांवकर, वेंगुर्ला मधून सहदेव शिरोडकर, नामदेव चव्हाण, दोडामार्ग मधून नारायण पार्सेकर, नरेश पार्सेकर यांना तर जिल्हा विशेष समाजभूषण पुरस्कार गणेश जाधव, दिलीप कानडे, संजय चव्हाण, योगिता आंदुर्लेकर, कांता कोडल्याळ, सुनील नारकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी सूत्रसंचालन बाळकृष्ण नांदोसकर यांनी केले.कार्यक्रमास बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.

35

प्रतिक्रिया व्यक्त करा