You are currently viewing सद्गुरू संगीत विद्यालयातर्फे ६ रोजी सावंतवाडीत ” गुरुवंदना “

सद्गुरू संगीत विद्यालयातर्फे ६ रोजी सावंतवाडीत ” गुरुवंदना “

सावंतवाडी :

श्री सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडीच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.६ ऑगस्ट २०२३ रोजी विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे प्रथम व द्वितीय सत्रांमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सद्गुरू संगीत विद्यालयाचे गुरूवर्य निलेश मेस्त्री यांचे नवोदित व यशस्वी विद्यार्थी शास्त्रीय गायन वादन करणार आहेत. या कार्यक्रमास सावंतवाडी संस्थान चे युवराज मान. लखमराजे सावंत – भोसले व युवराज्ञी मान. श्रद्धाराजे सावंत – भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून पंडीत जितेंद्र अभिषेकी बुवा यांचे शिष्य श्री दामोदर उर्फ भाई शेवडे, (धारगळ -गोवा) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रथम सत्र स. ९.३० ते १.३० उद्घाटन समारंभ व नवोदित विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण तर दुसऱ्या सत्रात दु ४.०० ते ८.०० विद्यालयाच्या नामांकित व यशस्वी विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण विठ्ठल रखुमाई मंदीर,सावंतवाडीत होणार आहे. यावेळी सर्व संगीत प्रेमींनी उपस्थित रहाण्याच आवाहन सद्गुरू संगीत विद्यालय शिष्य परिवार व पालक वर्गाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा