You are currently viewing सुभाष मोर्ये यांना बांदा येथील व्ही.एन. नाबर शाळेत श्रध्दांजली अर्पण

सुभाष मोर्ये यांना बांदा येथील व्ही.एन. नाबर शाळेत श्रध्दांजली अर्पण

बांदा

जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला।

या ओळींप्रमाणे श्री. बांदेश्वर भूमिका देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष, सेवानिवृत शिक्षक तथा बांदा शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी सुभाष शांताराम मोर्ये (७३) यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. व्ही एन नाबर ट मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा  च्या वतीने श्रध्दांजली देण्यात आली.

बांदा येथील डॉक्टर डी. बी. गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्टचे ते पहिले सचिव होते. डॉक्टर गायतोंडे यांच्यासोबत सुरू केलेल्या शैक्षणिक कार्यात ते अखेरपर्यंत कार्यरत होते. विज्ञान विषयात त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांना साहित्याची विशेष ओढ होती. शतायु ग्रंथालय असलेल्या नटवाचनालय बांदाचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूलचे ते स्कूल गव्हर्निंग सदस्य होत. शाळेतील कुठल्याही कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित असायचे. शाळेबरोबर त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते .विज्ञान हा आवडीचा विषय असल्यामुळे ,शाळेत विज्ञान दिन साजरा करताना ते विशेष सहकार्य व मार्गदर्शन करायचे.श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई चे चेअरमन श्री.मंगेश रघुनाथ कामत तसेच  स्कूल गव्हर्निंग कौन्सिल  सदस्य श्री.भाऊ वळंजु ,श्री.पास्ते व मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उपमुख्यध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर सहशिक्षिका हेलन रॉड्रीगस, रसिका वाटवे, स्कूल गव्हर्निंग कौन्सिल  सदस्य भाऊ वळंजू आणि शशी पित्रे तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत सुभाष मोर्ये यांना श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो व त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना केली.

 

तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखावले,

मनाचा तो भोळेपणा

कधी नाही केला मोठेपणा

गेला अचानक प्राण

पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना।

प्रतिक्रिया व्यक्त करा