You are currently viewing साळगाव येथील चंद्रहास बाळकृष्ण सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत दुःखद निधन

साळगाव येथील चंद्रहास बाळकृष्ण सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत दुःखद निधन

*साळगाव येथील चंद्रहास बाळकृष्ण सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत दुःखद निधन*

कुडाळ प्रतिनिधी :

कुडाळ तालुक्यातील साळगाव (मळावाड) येथे राहणारे मनमिळावू स्वभावाचे आदर्श प्रभावी व्यक्तिमत्व, मितभाषी आणि शिस्तीचे पालन करणारे चंद्रहास बाळकृष्ण सावंत वय (59) यांचे सोमवार 31 जुलै रोजी दुपारी दुपारी 1.00 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10.00 वाजता भांडुप स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
साळगाव मळावाड येथे त्यांच्या दुःखद निधनाची बातमी पोहोचताच अनेकांना धक्काच बसला. अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. चंद्रहास सावंत हे सुरक्षारक्षक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना गावची ओढ होती, ते भजन प्रेमी होते. भांडुप मधील रमाबाई नगर 2 येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे आहेत. साळगांव मळावाड येथे विविध पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
चंद्रहास सावंत यांचे झाराप गावातील कमलाकर माणगावकर यांच्याशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते. तळागाळापर्यंत पोहचलेले उमदे, लढवय्ये नेतृत्व गावच्या सर्वांगीण
विकास कामांसाठी त्यांचा सातत्यपूर्ण असा पाठपुरावा आणि धडपड असायची. त्यांचे असे अकाली निधन त्यांच्या कुटुंबिंयांसह, कार्यकर्त्यांकरिता एक आघात म्हणावा लागेल .

प्रतिक्रिया व्यक्त करा