कणकवली
तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे शिबिर जिल्हा रक्तपेढी यांच्या सहकार्याने झाले.
या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, डॉ. अभिजित कणसे, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उपाध्यक्ष राजू वळंजू, दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज तळेकर, शशांक तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दोनदा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. याशिवाय अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, शेती आणि सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात. तर तळेरे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांनी लक्ष वेधलेल्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे अशाही सामाजिक उपक्रमाला नेहमीच सहकार्य असते. त्यात एक सामाजिक उपक्रम म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याहीवेळी 54 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. हे शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी जिल्हा रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गेश गुंगेवाड, अधीपरीचालिका प्राजंली परब, रक्तपेढी तंत्रज्ञ रुबिना मसलत, मयुरी शिंदे तसेच कर्मचारी नाऊ कोकरे, सुरेश डोंगरे, नितीन गावकर यांचे विशेष सहाय्य मिळाले.