You are currently viewing हॉरर कॉमेडीपट ‘सुस्साट’चे लंडनमध्ये चित्रिकरण सुरु

हॉरर कॉमेडीपट ‘सुस्साट’चे लंडनमध्ये चित्रिकरण सुरु

*हॉरर कॉमेडीपट ‘सुस्साट’चे लंडनमध्ये चित्रिकरण सुरु*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट, ए बी इंटरनॅशनल, मर्ज एक्स आर स्टुडिओ आणि डीएनए पिक्चर्स घेऊन येत आहेत ‘सुस्साट’ हा एक धम्माल हॉरर कॉमेडी चित्रपट. लंडनमध्ये नुकतंच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सुपरफास्ट विनोदी भयपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव एकत्रितपणे विनोदाची आतिषबाजी करताना दिसणार आहेत.

‘सुस्साट’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट अंबर विनोद हडप यानं लिहिला आहे तर विशाल देवरुखकर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब यांच्यासोबत अभिनेत्री विदुला चौगुले पहिल्यांदाच हटके भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. विजय केंकरे आणि शुभांगी लाटकर यांच्यासारखे वरिष्ठ कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटाच्या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एका जुनाट प्रथेचा पर्दाफाश धमाल पद्धतीनं केला जाणार आहे.

‘सुस्साट’ या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत, प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर चित्रपटाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, सनिस खाकुरेल हे आहेत. तसंच, चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांच्याकडे आहे. कुणाल करण या चित्रपटाचे संगीतकार आहेत.

‘सुस्साट’ चित्रपटाचं चित्रीकरण लंडन मध्ये सुरू झालं आहे. ‘सुस्साट’ चित्रपटाच्या कथेतील अनेक विचित्र योगायोग आणि त्यामुळे उडणारी धम्माल आता पडद्यावर पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =