सावंतवाडी :
यंदाच्या वर्षी वाफोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेने दोन्ही विभागात संस्था पातळी व बँक पातळीवर १०० टक्के वसुली केली. या केलेल्या उत्कृष्ट कामगीरीबद्दल जिल्हा बँकेच्या वतीने संस्थेचा सत्कार करून संस्थेला २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संस्था चेअरमन धनश्री विलास गवस व व्हा. चेअरमन अनिल गवस व सर्व सहकारी यांनी हा सत्कार स्वीकारला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी संस्था कार्यकारिणीचे कौतुक केले.
वाफोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे दोन विभाग आहेत एक मुख्य विभाग तर दुसरा धान्य विभाग धान्य विभागा मार्फत वाफोली, विलवडे व भालावल गावाला धान्य वितरीत करण्यात येते. संस्थेने आता पर्यंत शेती कर्ज, पीक कर्ज, शेतघर कर्ज व व्यवसाय निगडित कर्ज वाटप केले. संस्थेच्या सभासदांची गरज पूर्ण केली. यापुढेही सभासदाच्या गरजा ओळखून विविध योजनांद्वारे कर्ज वितरीत करण्यात येणार आहे. तसेच महिला वर्गासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत. असे संस्थेचे चेअरमन धनश्री विलास गवस यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन धनश्री गवस, व्हा चेअरमन अनिल गवस, शिवाजी गवस, मारुती गवस, मंथन गवस, चंद्रकांत आईर, दशरथ आईर, जयदेव गवस, न्यानेश्वर ठाकूर, भाग्यश्री खानोलकर, सचिव सुधी परब, सेल्समन संगीता कोकरे उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानामुळे संस्थेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.