You are currently viewing राज रावलने ‘द अनस्पोकन’ चित्रपटातून केली सुरूवात

राज रावलने ‘द अनस्पोकन’ चित्रपटातून केली सुरूवात

*राज रावलने ‘द अनस्पोकन’ चित्रपटातून केली सुरूवात*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

लोकप्रिय अभिनेत्री पूजा घई यांचा मुलगा राज रावल याने ‘द अनस्पोकन’ या पहिल्याच चित्रपटात आपल्या सक्षम अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. त्याने जगभरातील प्रसिध्द प्रशिक्षणसंस्थांमधून आपल्या अभिनय कलेला पैलू पाडले असून पडद्यामागे काम करण्याचा अनुभवही घेतला आहे.

अत्यंत प्रतिभाशाली नवोदित अभिनेता राज रावलने ‘द अनस्पोकन’ या लघुपटाच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला आहे. व्यक्तिरेखेत प्राण फुंकण्याची त्याची क्षमता आणि त्याचं कामासाठी असलेलं समर्पण, उत्कृष्टता राजने आपल्या पहिल्याच लघुपटातून दाखवून दिली आहे. राजने अमेरिकेतील प्रतिष्ठित ली स्ट्रेसबर्ग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे प्रक्षिक्षण घेतले. प्रसिध्द जेफ गोल्डबर्ग स्टुडिओमध्ये डिप्लोमा कोर्स करण्यासाठी भारतात परतलेल्या राजने गणेश आचार्य डान्स अकॅडमीमधून नृत्य प्रशिक्षण घेतले. शारीरिक फिटनेसवरही तो भर देतो आहे.

केवळ अभिनयच नव्हे तर अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या ‘लक्ष्मी’ तसेच ‘मिशन मजनू’ या चित्रपटांसाठी राजने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. ‘हम, तुम अँड देम’ नामक वेब मालिकेसाठी निर्मिती टीम बरोबर कामाचा अनुभवही त्याने घेतला आहे. अद्भुत प्रतिभा, व्यापक प्रशिक्षण आणि चित्रपटाचा अनुभव या जोरावर राज रावल प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा