*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एका पुतळ्याची कहाणी…!*
कोप-यात पडलो होतो
तेचं बरं होत
अडगळीत टाकलं होत
तेही बरं होत..
आज चौकात आणून उभं केलं
पूजा,सत्कार,सोहळ्याची गरज नव्हती
विस्मृतीच्या गर्तेत आनंदी होतो
मला जगापुढे यायची इच्छा नव्हती..
अंत्यसंस्कारापेक्षा पुतळ्याचा समारंभ
दिमाखदार थाटात झाला
माझ्या हरकतीला !शून्य किंमत
सोहळा आनंदात पार पडला…
माझा जीवनपट आता बदलला
पुतळ्याचा मला त्रास होतोय
मला माझी पूजा नकोशी होते
माझ्या सावलीकरता झाकून घेतलयं.
पुतळ्यात मी माझा नरक गिरवतोय
उष्ण कोरडा वारा धडका मारतोयं
देव्हा-यातील दगड पूर्वीच निघून गेले
सन्मानाचं दगडीरूप नकोस होतयं..
प्रत्येकाची काळवेळ ठरली असते
काळाआधी काळानंतर ती व्यर्थ असते
पुतळा उभा करणं!कमकुवत समुहाची
माथ्यावर मारण्याची एक खोड असते
माझ्या डोक्यावरचं मोकळ आभाळ
सावलीकरता त्यांनी झाकून घेतलं..
इतिहासाची आठवण पुनावृत्ती चुकीची
भर चौकात आणून त्यांनी मला उभं
केलं..मरणानंतरचं जगणं असह्य केलं
पुतळ्यातलं जगणं नकोस झालं!!
बाबा ठाकूर