*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*
*कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) :- शाप की वरदान..?*
*वाचन मनन चिंतन*
*तीन गुण जया ठायी*
*गरज न लागे तयाशी*
*झुकणे कोणा पायी*
जग बदललं, नवं तंत्रज्ञान हाताशी आलं तरीही जिथं जीवन आहे तिथे मृत्यू अटळ आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी विज्ञान काही गोष्टी थोपवू शकतं पण टाळू शकत नाही. असाध्य ते साध्य करू शकतं पण उत्तमोत्तम, निर्दोष निर्मिती विज्ञानालाही शक्य झाली नाही. आपण बऱ्याचशा गोष्टी, काही प्रमाणात माहिती सर्रासपणे गूगलला विचारतो कारण अलीकडे सहज साध्य म्हणून ती सवय अंगवळणी पडली आहे. परंतु गूगल असो वा चॅट जीपीटी कोणीही निर्दोष माहिती देऊ शकत नाहीत; तीच माहिती अवास्तव वाचन, मनन अन् वाचलेल्या विषयावर चिंतन केलेली व्यक्ती देऊ शकते. गूगल अथवा कोणतेही डिजिटल तंत्रज्ञान सर्वज्ञानी नसेल परंतु नानाविध विषयांचे वाचन केलेली व्यक्ती सर्वज्ञानी असते… ज्याच्या अंगी हे तिन्ही गुण असतात त्याला कोणापुढे वाकावे, झुकावे लागत नाही. त्याची बुद्धिमत्ता हे वरदान नसते तर ती गाढा अभ्यास आणि वाचनातून केलेली त्याची स्वकमाई असते.
देशात डिजिटल क्रांती झाली, ज्यांची चिल्लर पैसे टाकून फोनवर बोलण्याची ऐपत म्हणा किंवा गरज नव्हती आज गावोगावी त्यांच्या हाती अँड्रॉइड फोन आले. फोनवरील नकाशा पाहून माणूस घरपोच होऊ लागला, कुणाला पत्ता विचारण्याची आवश्यकता भासत नाही. संवाद तुटले, माणसे माणसांपासून दुरावली. फोन जवळ करू लागली. जगभरातील कुठलीही माहिती हवी असेल तर पुस्तकं वाचून शोधावी लागतं असे पण आता मात्र मोबाईल फोनवर केवळ “व्हॉईस” वर क्लिक केलं आणि बोललं तरी माहिती समोर येते. १००% बरोबरच असेल याची खात्री देता येत नसली तरी “आंधळा मागतो एक डोळा….” तशी परिस्थिती होते अन् माणूस क्षणार्धात मिळालेल्या माहितीने सुखावतो… दोन बदाम खाऊन बुद्धी तल्लख झाल्याचा त्याला आभास होतो. पण इथे एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे…”गूगल वर मिळालेल्या माहितीने माणूस बुद्धिवान होतो का..? त्याच्या बुद्ध्यांक वाढला का..?” नाविलाजाने का होईना, उत्तर नकारार्थीच येते.
आता म्हणे गूगल पेक्षाही कर्तृत्ववान चॅट जीपीटी आली… कोणताही प्रश्न विचारा; उत्तर क्षणार्धात समोर येणार…
व्वा… क्या बात…
विषय कोणताही असो, कविता, लेख, सारं साहित्य तयार मिळणार…
पण,
त्या तयार साहित्यातून, उत्तरांमधून समाधान मिळणार का…?
आपण काहीतरी नवे शिकतो…कुणीतरी बनलो याचं आत्मसुख भेटेल का..?
वडिलोपार्जित जमीन, संपत्ती मिळाली म्हणून घरी बसून खाल्ल्यावर माणूस आळशी बनतो, आरोग्य सुद्धा गमावतो. कारण हातपाय न हलवता खाल्लेलं अन्न सुद्धा पचत नाही, शारीरिक व्याधी जडतात, रोगांना निमंत्रण मिळते… मग आयते ज्ञान घेऊन ज्ञानी होता येईल का..? विकतच्या ज्ञानाने मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल का..?
कृत्रिम ज्ञानाने चारचौघात ज्ञानाचा देखावा करू शकतो का? नाही, कारण तिथे तमाशा होईल, आपले अज्ञान उघडे पडणार, जगासमोर येणार, नाचक्की होणार.
कृत्रिमरित्या तयार केलेल्या फुलला सुगंध येतो का..?
नाहीच….! परंतु जंगलात फुललेल्या रानटी फुलाला सुद्धा कुठला ना कुठला नैसर्गिक सुगंध, वास असतोच. तो वास, सुगंध मनाला मोहून टाकतो.
मग कृत्रिम साहित्यातून आनंद तरी कसा घेता येईल..? सामान्य ज्ञान तरी कसे वाढणार..?
गूगल असो की चॅट जीपीटी… दोन्हींच्या प्रभावामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली. नवं तरुणांचा, मुलांचा बुद्ध्यांक कमी होत गेला. वाचन कमी झालं, मनन, चिंतन या तर मुलांच्या मनाला स्पर्शही करत नाहीत त्यामुळे लेखन कलेकडे सुद्धा साफ दुर्लक्ष झाले. अक्षराचे वळण पाहून कित्येकदा “सुंदर हस्ताक्षर” म्हणून पाठीवर कौतुकाची थाप मिळायची… आज कौतुक कोण आणि कशाचे करणार? असे विचार मनात घर करू लागले. माणसाला कृत्रिम सुख, समाधान मिळालं तर आनंद घेता येईल का..? सुख,समाधान हे शाश्वत पाहिजे तरच आनंद घेता येतो मग माणूस ज्ञान कृत्रिम का मिळवतो..?
कृत्रिम मिळणारी वस्तू असो वा ज्ञान त्याने क्षणिक आनंद मिळेल परंतु दीर्घकाळ समाधान मिळवायचं असेल तर ज्ञान कृत्रिम नकोच…शाश्वत पाहिजे.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यात नव्या पिढीला आंधळीच नव्हे तर पांगळी सुद्धा बनवणार आहे. वाचनापासून नवी पिढी दूर झाली असून “आयत्या पिठावर रेघोट्या” मारून आपण बुद्धिमान असल्याचा दिंडोरा गावभर वाजवत असते. त्यामुळे नवे तंत्रज्ञान आत्मसात करूनही ते तंत्रज्ञान कसे विकसित झाले..? कोणी विकसित केले..? अशा अनेक प्रश्नांपासून अनभिज्ञ असते. वाचन नाही की लेखन, सखोल माहिती नाही…अर्धवट आयते ज्ञान शोधणारी नवी पिढी म्हणून तर बुद्धिजीवी न बनता झाडावरील बांडगुळासारखी परजीवी बनली आहे. ती फुलते, दुसऱ्याच्या जीवावर जगते तरीही तोऱ्यात…!
कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला ज्ञानी बनविण्यापेक्षा अज्ञानी, अपंग बनवीत असल्याने वरदान नव्हेच तर शाप बनली आहे…
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-