You are currently viewing आनंद

आनंद

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*आनंद…!*

आपल्या शरीरात
१)अन्नमय ,
२)प्राणमय ,
३)मनोमय,
४)विज्ञानमय आणि
५)आनंदमय
यातील आनंदमय कोशापर्यंत कसे पोहोचायचे ते योगाभ्यासात कळतेच ! पण आनंदमय कोशातील *आनंद* शब्द आपला वाटतो व मन सहज विचार करु लागते !!
हे पाच कोश आहेत . आपण सहज म्हणतो की त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली !! पण तो आनंद कसा असतो ? हे आपल्या उपनिषदांनी सांगितले आहे . आनंदाचं विश्लेषण आमच्या उपनिषदांशिवाय कोण उत्तम सांगू शकेल आम्हाला ?
चांगला , वेदाध्ययन केलेला , आशायुक्त , दृढस्वभावी , बलवान अशा तरुणास ह्या सर्व पृथ्वीचे वित्तपूर्ण राज्य मिळावे , त्या योगे त्याला जो आनंद मिळतो तो १ मानुषानंद होय .

१००मानुषानंद=१मनुष्यगंधर्वानंद
१००मनुष्यगंधर्वानंद=१देवगंधर्वानंद
१००देवगंधर्वानंद=१चिरलोकपितरानंद
१००चिरलोकपितरानंद=१आजानदेवलोकानंद
१००आजानदेवलोकानंद=१कर्मदेवानंद
१००कर्मदेवानंद=१देवानंद
१००देवानंद=१इन्द्रानंद
१००इन्द्रानंद=१बृहस्पत्यानंद
१००बृहस्पत्यानंद=१प्रजापत्यानंद
१००प्रजापत्यानंद=१ब्रह्मानंद

अशा ब्रह्माचा साक्षात्काररुपी आनंद जो जाणतो त्याला कसलेही भय रहात नाही !! मी चुकीचे कृत्य केले वा मी पाप केले ! हे ही भय वा हा ताप त्याला रहात नाही !!
ही सर्व माहिती तैत्तिरीयोपनिषदात आहे . हे सर्व वाचल्यावर मी विचारच करत बसलो की पल्ला किती गाठायचा आहे !!!!!!! आपण कुठे आहोत ? ऋषि , संत , गुरु , ब्राह्मण ( ज्ञानार्थी हं , पोटार्थी नाही !! ) , मुनी , सन्यासी , शंकराचार्य , जपी , तपी , महाराज , ही जी त्या त्या क्षेत्रातील परमोच्च शिखरं असतात , त्यांनी काय केलं असेल ? कसे आचार—विचार—उच्यार केले असावेत !!!! कसे व्रतनियमादि वा यमनियमादिंचे पालन केले असेल ?? कारण मनुष्य जन्मानंतर मृत्यू , नंतर यमलोक , त्यात चित्रगुप्ताचे हिशोबानुसार यमयातना , त्या भोगल्यावर चौर्‍यांशी लक्ष योनी फिरुन मग नंतर मनुष्य जन्म ! मग मनुष्य जन्मात मोक्षाचे वाटेवर जाण्यासाठी काय काय करावे लागते !! हा ब्रह्मानंद काय केलं तर मिळतो ? कुणाला मिळतो ? पाप पुण्याचा हिशेब कसा ? ( आपल्याला जर मुंबई ते दिल्ली , हा जाण्याचा हिशेब करायचा तर चार दिवस लागतात ! ) हा विचार सहज डोकावतो व मन पुन्हा कामात गढून जाते .
🙏🙏
लेखनधर्म—
कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा