निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
आज दिनांक 28 जुलै 23 रोजी स्वरसंध्या हा हिंदी मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम माऊली उद्यान , प्राधिकरण येथे सादर झाला.
श्री अविनाश पाठक यांना प्रति किशोर कुमार म्हणतात हे त्यांनी त्यांच्या गाण्यांमधून सिद्ध केले.
सौ विदुला आरेकर यांनीही अतिशय गोड आवाजात भक्ती गीते व हिंदी द्वंद्व गीते गायली.
संघाचे सदस्य रजनी गांधी, सुनीता एन्नुवार ,अनुराधा कुलकर्णी ,अंजु सोनवणे, माधुरी वैद्य डिसोजा, चंद्रशेखर जोशी, सुभाषराव जोशी ,आनंदराव मुळुक यांची प्रमुख उपस्थिती होती.
जुनी,श्रवणीय गीते ऐकून सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते ,रसिकांनी टाळ्यांचा ताल धरला होता.
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा, कथालेखिका,कादंबरीकार सौ अर्चना वर्टीकर यांनी सूत्रसंचालन केले .
डॉ शुभांगी मेहेत्रे यांनी सर्वांचे आभार मानले . कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये चालू महिन्यातील सभासदांचे वाढदिवस सत्कार करून साजरा केले गेले.
जिंदगी हसने गाने के लिए है पल दो पल आणि आराधना चित्रपटातील कोरा कागज था ये मन मेरा ही गाणी लोकांनी डोक्यावर घेतली. अनेक वेळा वन्स मोरही मिळाले.