देवगड
देवगड एसटी बस स्थानक नूतनीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी आमदार नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मिळाला आहे
देवगड एसटी बस स्थानकाची पूर्णतः दुरावस्था झाली असून आमदार नितेश राणे यांनी सतत यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला होता बऱ्याचशा गळत्या इमारती व खराब झालेली स्वच्छतागृहे तसेच सांडपाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देऊन ही वस्तुस्थिती नजरेला आणून दिली होती त्यांच्या आदेशानुसार बस स्थानकासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत