दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत चालते बैठक
अलीकडेच बांदा येथे जुगाराच्या मैफिलीत हातचलाखी केल्याने डोके फोडलेल्या मोर्जेच्या नीतल्याची जुगाराची बैठक कणकवली पासून अवघ्या ५ किमी अंतरावरील *(क)रंदळे* येथील एका रिसॉर्ट वर सुरू असून रोज दुपारी ३.०० वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.०० वाजेपर्यंत सुरू असते. या बैठकीला *(का)पू (व)रात* या खाकिच्या शिलेदाराचा आशीर्वाद असल्याचे सूत्रांकडून समजते.
कणकवली *(क)रंदळे* येथील बैठक आटोपून मोर्जेच्या नितल्याची संपूर्ण टीम गोव्याकडे बैठकीसाठी रवाना होते. बस ड्रायव्हर असलेल्या मोर्जेच्या नितल्याचे वेगवेगळे पार्टनर असून कणकवली येथील बैठकीसाठी (व)रनाते, (के)ळेकर, पानवाला (क)ळी, वेंगुर्ला येथील फॉरेन्स डिसोजा असे पार्टनर आहेत. एका बैठकीत लाखोंची उलाढाल होते आणि खाकी वर्दिला देखील मोठा हफ्ता मिळतो त्यामुळे *(का)पू (व)रात* हा खाकिचा शिलेदार जुगाराच्या अड्ड्याना संरक्षण पुरवितो. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या होत असलेला दुर्लक्ष जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध्य धंद्यांना कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
कणकवली, रेडी, कोलगाव येथे सुरू असणाऱ्या धंद्याकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जातीनिशी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.