जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करावी.
अशासकीय सदस्य प्रा.श्री.एस. एन.पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक ऑगस्टमध्ये आयोजित करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात अशी विनंतीवजा मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा. श्री. एस. एन. पाटील यांनी के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ही जिल्हा स्तरावरील शासकीय आणि अशासकीय सदस्य असलेली शासनमान्य परिषदरुपी व्यासपीठ आहे.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील २८ अशासकीय सदस्य पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्या संदर्भाने के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांनी दिनांक १७ जुलै,२०२३ रोजी विविध प्रवर्गातील १७ अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी अशासकीय सदस्यांच्यावतीने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.
मागील दोन-तीन वर्षापासून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठका झालेल्या नाहीत. सर्वसामान्य ग्राहकांशी संबंधित असणाऱ्या समस्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून उपस्थित करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला जातो.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद या नात्याने नवनियुक्त अशासकीय सदस्यांची बैठक ऑगस्टमध्ये आयोजित करून परिषदेच्या कामकाजाला सुरुवात करावी अशी विनंतीवजा मागणी मेलद्वारे केली आहे. माहितीसाठी सदर मेल जिल्हा पुरवठा अधिकारी, सिंधुदुर्ग व ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेला पाठवला आहे.