*भारतीय मजदूर संघाचा ६८ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
श्रध्येय दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेल्या भारतीय मजदूर संघाचा ६८ वा वर्धापनदिन सोहळा मराठी ग्रंथ संग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृह दादर येथे २५ जुलै २०२३ रोजी मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माथाडी कामगार नेते आणि अध्यक्ष – आण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळ (कॅबिनेट मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढूमणे, बँकिंग क्षेत्राचे प्रभारी रामनाथ केणी, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या शर्मिलाताई पाटील, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मधुकर येवले, मुंबई अध्यक्ष बापू दडस, मुंबई सचिव संदीप कदम तसेच मुंबई जिल्हा भारतीय मजदूर संघाचे सर्व पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील सन्माननीय सदस्य उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे भारतीय मजदूर संघ मुंबईच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी घरेलू कामगारांच्या दहावी बारावी पास झालेल्या मुलांना वह्या वाटप करण्यात आले.
मुंबई इंटकचे माजी अध्यक्ष जनार्दन सिंह यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय मजदूर संघात जाहीर प्रवेश केल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह सत्कार करण्यात आला. पटना येथे झालेल्या एल-२० प्रोग्रामसाठी उपस्थित राहिल्याबद्दल भारतीय मजदूर संघ मुंबईच्या उपाध्यक्ष पार्वती अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाचा सन २०२२/२३ चा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रसन्न पारकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आरसीएफ को-ऑप. सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल भारतीय मजदूर संघाचे सदस्य प्रवीण गोंजी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू दडस यांनी केले. भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष जनार्दन सिंग यांनी कामगारांची सद्यस्थिती बाबत विचार व्यक्त केले. शर्मिलाताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनिल ढुमणे यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला. विवेक भटकर यांनी आभार प्रदर्शन केले. मुंबईत अतिवृष्टी असूनदेखील दादर येथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्य यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
*संवाद मिडिया*
🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨🎓👩🎓
🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇
◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*
https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*
*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*
*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰
*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*
🪪👩🏻🎓🧑🏻🎓
*स्कॉलरशिप*
*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*
*आताच भेट द्या –👇🏻*
*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*
*http://www.mitm.ac.in/*
*संपर्क -*📞
*02362-299195*
*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*
🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰
*FC Code-3440*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-