You are currently viewing राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेत आर्थिक तरतूद वाढवून आशा, गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेत आर्थिक तरतूद वाढवून आशा, गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करा

मालवण:

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान योजना जनतेच्या हितासाठी महत्वाचे आहे. या योजनेची आर्थिक तरतूद वाढवून यामध्ये काम करणाऱ्या आशा, गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करून वेतन श्रेणी लागू करा. या मागण्यांसाठी मुंबई आझाद मैदान येथे राज्यातील आशा व गट प्रवर्तक सहभागी आहेत. आमचाही या आंदोलनाला पाठिंबा असलेबाबत निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन मालवण तालुका कमिटीच्या वतीने बुधवारी मालवण नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांना देण्यात आले.

आमच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठवा. असेही निवेदनात म्हटले आहे. मालवण तालुका कमिटीतील आशा व गट प्रवर्तक यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा