You are currently viewing सिंधुदुर्ग काँग्रेसच्या आठ महिला तालुकाध्यक्षांची निवड

सिंधुदुर्ग काँग्रेसच्या आठ महिला तालुकाध्यक्षांची निवड

महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारे यांची माहिती

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठही काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यात सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी सपना वेंगुर्लेकर, वेंगुर्ले दिशा पालव, दोडामार्ग बिना नाईक, मालवण ममता तळगावकर, कुडाळ सोनिया मुंज, वैभववाडी प्रांजली जाधव, देवगड कल्पना गावकर आणि कणकवली अमृता मालणकर असा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी दिली. दरम्यान प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी ही निवड केली असल्याचे सौ. वंजारी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा