रस्त्यावर दुकाने थाटून सावंतवाडीच्या आठवडा बाजारात येणार्या परप्रांतीयांची दादागिरी – परिमल नाईक
सावंतवाडी
आठवडा बाजारासाठी या ठिकाणी येणार्या विक्रेत्यांकडून दादागिरी सुरू आहे. रस्त्यावरच मंडप मारले जातात. त्या ठिकाणावरून साधी दुचाकी सुध्दा येवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पालिकेने संबंधितांना तात्काळ समज द्यावी, अन्यथा कार्यवाही करावी, परप्रांतीय व्यापार्यांचे लाड नको, अशी मागणी सावंतवाडी पालिकेचे माजी आरोग्य सभापती अॅड. परिमल नाईक यांनी केली आहे. दरम्यान पालिकेत गेली दोन वर्षे सत्ताधारी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांची मनमानी सुरु आहे. त्याचाच एक प्रकार म्हणजे मच्छीमार्केट मध्ये फुटलेल्या फरश्या दिड वर्ष बदलण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हे प्रकार बंद करावेत याकडे मुख्याधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.
आठवडा बाजार गोदामाच्या जागेत हलविण्यात आला.
त्या ठिकाणी बाजार रस्त्यावर भरवला जातो, दुकाने मांडणार्या व्यापार्यांना मधून दुचाकीसाठी वाट ठेवावी अशा सुचना आहेत. मात्र पुर्णतः प्लास्टीक शेड घालून त्या ठिकाणी दोर्या लावल्या जातात. त्यामुळे तेथून ये-जा येत नाही. विचारणा केल्यानंतर व्यापार्यांची दादागिरी आहे. जे व्यापारी येतात त्यांचा आणि सावंतवाडीचा काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे बाजार पेठेत मिळणार्या वस्तू आणि आठवडा बाजारात मिळणार्या वस्तू यात मोठा फरक नसतो. परंतु या व्यापार्यांच्या माध्यमातून येथील पैसे दुसरीकडे नेेले जात आहेत. त्यामुळे हा प्रकार वेळीच आवरावा. याबाबत आपण हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष अॅड. संदिप निंबाळकर यांच्याशी सुध्दा बोललो. ते माझे चांगले मित्र आहेत. विरोधासाठी विरोध नाही परंतु याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले, दोन वर्षे पालिकेत सत्ताधारी नाहीत. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांची मनमानी सुरू आहे. दीपक म्हापसेकर वगळता अन्य कोणी प्रामाणिकपणे काम करताना दिसत नाही तर अनेक कर्मचारी कार्यालयात मिळत नाहीत. याचा अनेकांना प्रत्यय आला आहे. त्यामुळे मुख्याधिकार्यांनी यात शिस्तबध्दता आणावी,