You are currently viewing करुणा सदन स्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश….

करुणा सदन स्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश….

दोडामार्ग
नुकत्याच जाहिर झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालात करुणा सदन स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी ग्रामिण सर्वसाधारण यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली यामधे आयुष गाड याने ग्रामिण सर्वसाधारण यादीत प्रथम क्रमांक पटकावला तर प्रभाकर गवस याने देखिल ग्रामिण सर्वसाधारण यादीत स्थान मिळवत यश संपादन केले.
विशेष म्हणजे आयुष गाड याने पाचवीत झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत देखिल यश संपादन केले होते.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल करुणा सदन स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर विनया, त्याचबरोबर शांती मंडळ सोसायटी पुणे, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष,पालक यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा