You are currently viewing तिलारी येथे आढळले दुर्मिळ प्रजातीचे कासव

तिलारी येथे आढळले दुर्मिळ प्रजातीचे कासव

दोडामार्ग :

 

तिलारी येथील पाताडेश्वर मंदीरानजीक अतिशय दुर्मीळ अशा प्रजातीचे भारतीय तारा कासव सुभाष लक्ष्मण दळवी यांना आढळून आले. ते कासव त्यांनी येथील वनविभागाच्या ताब्यात दिले.

पाळये येथील शेतकरी सुभाष लक्ष्मण दळवी हे सोमवारी दुपारी ३:३० वा.च्या सुमारास दोडामार्गच्या दिशेने जात होते. दरम्यान दोडामार्ग-विजघर राज्यामार्गावरील तिलारी येथील पाताडेश्वर मंदिराजवळ आले असता त्यांना एक अतिशय दुर्मीळ प्रकारचे कासव दृष्टीस पडले. ते कासव त्यांनी वनविभागाच्या शिवाय ताब्यात दिले. हे कासव भारतीय तारा कासव नावाने ओळखले जाते. शिवाय गतवर्षी देखील याच प्रजातीचे कासव याच परिसरात मिळाले होते. मिळालेल्या या कासवाचे वजन ८०० ग्रॅम असून लांबी १७ सेमी, रुंदी १० सेमी, घेरी २५ सेमी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा