You are currently viewing आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स २९९ अंकांनी घसरला, निफ्टी १९,७०० च्या खाली

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स २९९ अंकांनी घसरला, निफ्टी १९,७०० च्या खाली

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारही लाल रंगात बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी बाजार तोट्यात बंद झाला. सोमवारी सेन्सेक्स २९९.४८ (०.४५%) घसरून ६६,३८४.७८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी ७२.६५ (०.३७%) अंकांनी घसरून १९,६७२.३५ वर बंद झाला. सोमवारच्या व्यापार सत्रात एफएमसीजी क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. मेटल आणि बँकिंग क्षेत्रातील समभागही कमजोरीने बंद झाले.

अमेरिकन व्याजदर धोरणाच्या सकारात्मक परिणामाच्या आशेने उत्साह, डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये सकारात्मक तेजी दिसून आली. रुपया ८१.८३ वरून ८१.८३ वर मजबूत झाला. अमेरिकेचे व्याजदर बुधवारी जाहीर होणार आहेत.

हॉटेल, सिगारेट, एफएमसीगी आणि पेपर व्यवसायात गुंतलेली दिग्गज कंपनी आयटीसी बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या हॉटेल व्यवसायाच्या विलगीकरणासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. असे म्हंटले जाते की डिमर्ज्ड कंपनीमध्ये आयटीसीची भागिदारी सुमारे ४०% असेल. नवीन उपकंपनीमध्ये सर्वात मोठा हिस्सा आयटीसी कडे असेल. डिमर्जरची बातमी बाहेर येताच कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांनी घसरले. मात्र, बाजारातील तज्ज्ञ या वृत्ताकडे सकारात्मकतेने पाहत आहेत.

आयडीबीआय बँकेचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जवळपास ६२ टक्क्यांनी वाढून रु. १,२२४ कोटी झाला आहे, जो मागील तिमाहीत रु. ७५६ कोटी होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न देखील समीक्षाधीन तिमाहीत ६१ टक्क्यांनी वाढून ३,९९८ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते २,४८८ कोटी रुपये होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा