You are currently viewing पाणी प्रश्नावर अरुणा धरणग्रस्त संघर्ष समितीचा इशारा

पाणी प्रश्नावर अरुणा धरणग्रस्त संघर्ष समितीचा इशारा

चार दिवसात पाणी प्रश्न न सुटल्यास तहसिल कार्यालयावर घागर मोर्चा – डॉ.जगन्नाथ जामदार

वैभववाडी

आखवणे, भोंम, नागपवाडी, पुनर्वसन मांगवली गावातील लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. चार दिवसात पाणी पुरवठा न झाल्यास,धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने तहसिल कार्यालयावर घागर मोर्चा नेण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने डॉ.जगन्नाथ जामदार यांनी दिले आहे.
गेली पाच ते सहा दिवस मांगवली पुनर्वसन गावात पाणी मिळत नसून प्रकल्प ग्रामस्थांची पाण्याविना हेळसांड होत आहे तरी पुनर्वसन विभागाच्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा येत्या चार दिवसामध्ये पाणी प्रश्न न सुटल्यास आम्हीं सर्व अरुणा संघर्ष कृती समितीच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा अरुणा संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी आकराम नागप, डॉ जगन्नाथ जामदार, अभय कांबळे, सरपंच आर्या कांबळे व ग्रामस्थांनी दिलेला आहे याची गंभीर दखल घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा