You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

सावंतवाडी

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक क्रांतिकारकांप्रमाणे लोकमान्य टिळकांनी देखील स्वराज्य प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न केले. व अशा थोर पुरुषांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना कळावे याकरिता स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दीपप्रजवलनाने व लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात केली. शालेय समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांविषयी माहिती दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ग्रीष्मा सावंत यांनी केले. इयत्ता ४ थी व ३ री मधील विद्यार्थ्यांनी स्वअभिनयाद्वारे व नाट्यस्वरुपात लोकमान्य टिळकांविषयी माहिती सादर केली व टिळकांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी शालेय सह. शिक्षिका सौ. चैताली वेर्लेकर यांनी आभाप्रदर्शन व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा