*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवणींच्या हिंदोळ्यावर.*
आठवणींच्या हिंदोळ्यावर
वेडे हे मन माझे झुलते,
तू नाही सख्या आज सोबत
माझे हृदय तुझ्यासवे बोलते..।१।
मी एकांती स्वतःला कोंडून
माझे दुःख मीच सावरते,
कठीण प्रसंगाला तोंड देत
माझे अश्रू मीच आवरते..।२।
तू जी स्वप्ने मला दाखविली
किती छान त्यास रंगविले,
आज प्रत्यक्षात मजसाठी
क्षणोक्षणी आभासी बनले..।३।
माझ्या यातनांना आठवते
दिलेल्या जखमा सळतात,
तयांना सारीते दू र दू र
पुन्हा येऊनी मज छळतात..।४।
आता वाटते माझ्यासवेच
जातील जीवनाच्या वेदना,
टाळून ही नाही टळतात
माझ्यातील तुझ्या संवेदना..।५।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*