You are currently viewing मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित गझलकारांचा गझल मुशायरा थाटात संपन्न

मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित गझलकारांचा गझल मुशायरा थाटात संपन्न

*मनस्पर्शी साहित्य परिवार आणि स्नेहल आर्ट अँड एज्युकेशनल सोसायटी यांचे संयुक्त आयोजन*

 

मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त मनस्पर्शी साहित्य परिवार आणि स्नेहल आर्ट अँड एज्युकेशनल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रित गझलकारांचा गझल मुशायरा रविवार दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला होता. या गझल मुशायराच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार मा.श्री रघुनाथ पाटील होते तर निमंत्रित गझलकार म्हणून मा.गझलकार प्रसन्न कुमार धुमाळ (पुणे), मा.गझलकार नवनाथ खरात (सोलापूर), मा .गझलकार रवींद्र सोनवणे (मुंबई), मा. गझलकर जीवन धेंडे, मा .गझलकार सुरेश तायडे आणि गझलकारा सौ.कल्पना हिंदुराव गवरे (UK )या खास लंडन येथून सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. गझलकारा सौ.कल्पना हिंदुराव गवरे (यु.के.) यांनी केलं. या गझल मुशायऱ्याचा आनंद गुगल मिटद्वारे देश विदेशातील शेकडो लोकांनी घेतला. सदरचा गझल मुशायरा ऑनलाइन घेण्यात आला.

मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला मराठी गझल मुशायरा सायंकाळी साडेसहा ते साडेआठ असा तब्बल दोन तास रंगला. गझल मुशायरामध्ये सामील एक से बढकर एक गझलकारांनी अप्रतिम अशा गझल सादर करून केवळ देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय श्रोत्यांची मने जिंकली. त्यामुळे आजचा गझल मुशायरा अविस्मरणीय असा झाला. या गझल मुशायराचे सूत्रसंचालन मा.गझलकारा सौ कल्पना हिंदुराव गवरे यांनी थेट लंडनवरून केलं. आपल्या सुमधुर आवाजातील सूत्रसंचालनाने सौ.कल्पना गवरे यांनी गझल मुशायरा मध्ये रंगत आणली. यापुढील मराठी गझल मुशायरा सप्टेंबर महिन्यात पुणे येथे आयोजित केला जाईल असे गझल विधा समितीने जाहीर केले आहे.

मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त एक दर्जेदार मुशायरा पेश केल्याबद्दल मनस्पर्शी प्रशासक समितीच्या अध्यक्षा कु.मानसीताई पंडित विलेपार्ले, मुंबई व्यवस्थापक कवी कु.निखिल प्रमोद कोलते, कल्याण उपाध्यक्ष कवयित्री कु.जयश्रीताई शेळके, बुलढाणा सहसंचालक व मार्गदर्शक कवी राजेश नागुलवार उर्फ राजमन, चंद्रपूर आदींनी सर्व गझलकार, स्नेहल आर्ट अँड एज्युकेशनल सोसायटी यांचे आभार मानले आहेत.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा