You are currently viewing तुटलेल्या वीज वाहीन्यांचा शॉक लागून तीन शेळ्यांचा मृत्यू : कोकिसरे बांधवाडी येथील घटना

तुटलेल्या वीज वाहीन्यांचा शॉक लागून तीन शेळ्यांचा मृत्यू : कोकिसरे बांधवाडी येथील घटना

वैभववाडी

तुटलेल्या वीज वाहीन्यांचा धक्का बसून तीन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोकिसरे बांधवाडी येथे ही घटना घडली. या घटनेत एक शेतकरी बालबाल बचावला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी 4 वा. च्या सुमारास घडली.तालुक्यात गेले आठ दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. नापणे धनगरवाडा येथील शेतकरी दत्ताराम कोंडू काळे हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी कोकिसरे बांधवाडी येथे गेले होते. दिवसभर जोरदार पाऊस पडत होता. शेळ्या जिथे चरत होत्या तिथे बाजूला विदयुत लाईन होती. या वाहीण्या अचानक तुटून खाली पडल्या. या वाहीण्यांना चरणा-या तीन शेळ्यांना स्पर्श झाला. त्यांना वीजेचा धक्का बसुन त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने काळे हे वीज वाहीण्या पडल्या त्यापासून थोड्याच अंतरावर होते. त्यामुळे या आपघातातुन ते थोडक्यात बालबाल बचावले आहेत. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळचे ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना माहीती दिली. वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत केला. या आपघाताची माहीती मिळताच विज वितरणचे उपअभियंता कानडे, पशु वैदयकीय अधिकारी, नापणे सरपंच प्रकाश जैतापकर यांनी घटनास्थळी येऊन पहाणी करुन पंचनामा केला आहे. तर वीज वितरण कंपनीकडून काळे यांना शेळ्यांची नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन यावेळी वीज वितरण कंपनीकडून देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा