You are currently viewing अशा घटनांमध्ये सरकार आपली जबाबदारी घेणार का ?

अशा घटनांमध्ये सरकार आपली जबाबदारी घेणार का ?

मुंबई :

नेहमीच येतो पावसाळा त्यातून कित्येकांना आपले प्राण गमवावे लागतं आहेत. हे दरवर्षीचे विदारक चित्र होऊ पाहते आहे.रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीचा डोंगर खचल्याने पुन्हा एकदा ते अधोरेखित झाले असून पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील माळीणची पुनरावृत्ती झाली आहे. यानिमित्ताने कित्येक गावं सोईसुविधांसाठी अद्याप उपेक्षित राहिली आहेत. हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.नेहमी प्रमाणे दुर्घटना घडून गेल्यावर अश्रू पुसण्याचे सोपस्कार केले जातात. तथापि अशा आपत्तीतून पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न होताना दिसून येते नाही. अलिकडील काही वर्षांचा मागोवा घेतला तर पाऊस जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कोसळतो. त्यांचा सामना करण्यात सरकारी यंत्रणा कमी पडते आहे. हे सर्वश्रुत असताना आरपीएफ जवान आपल्या जीवाची बाजी लावत दुर्घटना स्थळापर्यंत जाण्यात यशस्वी ठरून अडचणींवर मात करत आहेत. या निमित्ताने काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सर्व सामान्य माणसाला भेडसावत आहे की, या लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत होता का? आदिवासी गावांमध्ये वैद्यकीय उपचार पोहचत असतील का? न आजवर दरडप्रवण भाग घोषित झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन तातडीने हाती घेऊन पुढील जीवितहानी थांबविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. आदिवासी गावांमध्ये एक गठ्ठा मतदानासाठी लोकप्रतिनिधी जातात. पण त्यांच्या समस्यांवर कधी फुंकर घालत नाहीत. कित्येक वेळा फक्त आश्वासने दिली गेली आहेत. आता कृती होणार कि नाही…

प्रमोद कांदळगावकर, भांडुप गाव
Mb.: 9969252991

प्रतिक्रिया व्यक्त करा