You are currently viewing नातं

नातं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*नातं.*

दोन अक्षरी शब्द खरंतर. नातं.
पण या दोन अक्षरी शब्दात सृष्टीचं फार मोठं तत्वच सामावलेलं आहे.

नातं याचा अर्थ कनेक्टिव्हिटी. जोडणे. एकाचं दुसऱ्याशी जोडणं आणि मग लक्षात येतं की संपूर्ण विश्व हे सतत कुठल्या आणि कुठल्या रूपाने जोडलं गेलं आहे. म्हणजेच नातं या शब्दाचा अर्थ उलगडताना ते फक्त वैयक्तिक पातळीवरच न उरता व्यक्ती आणि विश्वातल्या अनंत कणाशी असलेलं बांधलेपण याची जाणीव होते. आणि मग नातं या संकल्पनेची प्रचंड व्यापकता लक्षात येते.

नातं दोन सजीव व्यक्तींच असतं,
नातं रक्ताचं, नातं धर्माचं, नातं सजीवाचं निर्जीवाशी असतं, नातं दृश्य असतं, नातं अदृश्यही असतं, नातं बोलकं असतं, नातं अबोल मूक प्राण्यांशी असतं, नातं व्यक्त असतं, नातं अव्यक्त असतं, नातं ओळखीचं असतं, नातं अनोळखी असतं आणि जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं या आवाढव्य ब्रम्हांडाशी अतूट नातं असतं.

नातं शत्रुशी असो व मित्राशी असो ते संपतं पण मरत नाही. आठवणीत ते उरलेलं असतंच. नाती घेऊनच माणूस जन्माला येतो आणि मृत्यूनंतरही तो त्याचं नातं आठवणीच्या रूपात ठेवून जातो. म्हणूनच आपण आपल्याला सोडून गेलेल्या प्रिय व्यक्तीच्या वस्तूंमध्ये नात्यांचं अस्तित्व सांभाळून ठेवतो.

नातं म्हटलं म्हणजे पहिली जाणीव होते ती प्रेमाच्या, मायेच्या, वात्सल्याच्या आविष्काराची. अशा नात्यांमध्ये प्रेमाबरोबर त्यागाची भावना असते आणि अशी नाती अतूट असतात. पण जी नाती मनात हेतु ठेवून जुळलेली असतात त्यात अपेक्षा आणि स्वार्थाचा अंतर्भाव असतो म्हणून ती तकलादू,असंध,मोडकी असतात. अशा नात्यात भरवसा आणि विश्वास नसतो. खरी नाती तुटत नाहीत आणि जी तुटतात ती नातीच नसतात असाही एक निष्कर्ष आपण काढू शकतो.

नातं घट्ट की नातं नाजूक, मोडक हे ते नातं कोणत्या पायावर उभं आहे त्यावर अवलंबून असतं. तुम्ही अगदी ग्रह, तारे, योग, गुण, नाड्या जुळवून नातं बांधलंत तरी अंतर्मनाचे धागे जुळले नाहीत तर ते नातं टिकणारच नाही.एकतर ते तुटेल किंवा फरफटेल. पण तरीही तुटलेल्या नात्यांच्या क्लेशदायक आठवणी मात्र मनात उरतातच. म्हणजे जे संपलं असं वाटतं ते अशा स्वरूपात उरतच.

ही तर सारी सजीव नाती. पण निर्जीवांशीही नाती असतातच की! कित्येक वेळा आपण अडगळीची खोली साफ करायचं ठरवतो आणि एक एक वस्तू उचलता उचलता त्या वस्तुंचाच आपल्या भोवती पुन्हा एकदा प्रचंड पसारा होतो. प्रत्येक मोडक्या वस्तूत आपलं मन अडकलेलं असतं. केवळ निरूपयोगी म्हणून आपण नाही फेकू शकत काही. कारण वस्तु जरी निर्जीव असल्या तरी मनातल्या आठवणी त्यात गुंतलेल्या असतात. ते नातं असं भिरकावून नाही देता येत चटकन!
माझ्या आजीच्या लुगड्याचा एक फाटका तुकडा मी अजून जपून ठेवला आहे. कारण त्या फाटक्या तुकड्याला आजीचा वास आहे, स्पर्श आहे, प्रेमाची ऊब आहे. त्या तुकड्याशी असलेलं माझं नातं कुठल्याही शब्दात व्यक्त न होणारं आहे.
काही वर्षांपूर्वी मी लंडनला हिंडत असताना एका स्ट्रीटवर मला एक पडकी भिंत दिसली. इतक्या गर्दीच्या ठिकाणीही ती भिंत सांभाळून ठेवण्याचं काय कारण असेल? नंतर कळलं की एका महान चित्रकाराचं ते घर होतं. ते कोसळलं पण त्या कलाकारावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ती पडकी भिंत त्याची आठवण म्हणून जपून ठेवली आहे. अशी असतात निर्जीवांशी नाती. मनातली नाती. सगळ्या प्रस्थापित कल्पनांना ओलांडून पलीकडे जाणारी.

अनोळखी नातीही अलौकिक असतात. एखाद्या लेखकाशी आपलं नातं जुळलेलं असतं. तसं पाहिलं तर ती संपूर्ण अनोळखी व्यक्ती असते आपल्यासाठी. पण त्याच्या साहित्याशी आपलं प्रेमाचं नातं असतं. पु.ल. कोण आपले? लता कोण आपली? तसं म्हटलं तर कुठल्याच व्याख्येतलं हे नातं नाही पण त्यांच्या साहित्याने आपलं जीवन आनंदी केलं. हे वाचकाचं लेखकाशी असलेलं नातं विलक्षण नाही का? लताच्या सुरात आपण अखंड बुडालो. त्या सुरांशी आपलं नातं असतं, नाही का?
एखाद्या नटाशी व नटीशीही आपलं गहिरं नातं असतं. ते नुसतं त्या व्यक्तीपुरतं बांधलेलं नसतं तर ते त्याच्या अथवा तिच्या अभिनय कलेशी जोडलेलं असतं. अशा अनेकांशी आपली कुठल्या ना कुठल्या माध्यमातून नाती असतात. अनोळखी पण खोल. ही नाती न तुटणारी, अमर असतात. सतत आपल्या बरोबर असतात.

काही नाती अदृश्य असतात. वाऱ्याची झुळूक, फुलांचा सुगंध, मातीचा वास, सागराची गाज, नदीची खळखळ— ही कुठली नाती असंच म्हणाल तुम्ही. पण विचार करा, काही फुलांच्या सुगंधात, वाऱ्याच्या हळुवार झुळकेशी आपला अंतरप्रवाह कनेक्ट होतो. काही आठवणी जाग्या होतात. मन हुरहूरते, विचलित होते आणि नेमकं हेच ते नातं. व्याख्या नाही त्याला, अस्तित्व नाही पण जाणीव आहे.
” जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे..” हा देव म्हणजे तरी कोण हो? कोणी पाहिला आहे का? ते मनातले एक आभासी रूप आहे आणि त्या अभ्यासाशी आपलं श्रद्धायुक्त नातं आहे. या नात्याशी मनातला संवाद आहे, प्रेम आहे, तक्रार आहे, भांडण आहे, शरणागती आहे, मागणं आहे, आभारही आहेत. असं हे भक्तीचं, प्रेमाचं नातं माणसाच्या जीवनातलं एक वल्हे आहे.

आणि निसर्गाशी असलेलं नातं? त्याला तर ना पार ना अंत. जगातली सगळी नाती या एका नात्यात एकवटली आहेत. त्वमेव माता,त्वमेव पिता,त्वमेव गुरु, सकलं त्वमेव. माझ्या मनात अशावेळी एक विचार येतो की निसर्ग म्हणजेच विश्व आणि या विश्वाशी नातं म्हणजेच वसुधैव कुटुंबकम! मग या वैश्विक नात्याचं महत्त्व जर आपण जाणलं तर मग कशाला होतील युद्धं, संहार, हिंसाचार, दहशतवाद? सध्या तरी हे स्वप्नच वाटत असलं तरी सत्यातल्या या नात्याचा आधार का वाटू नये?

थोडक्यात नातं म्हणजे जोडणं. संपूर्ण ब्रम्हांडात प्रत्येक कण कणाशी जोडलेला आहे. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि अंतराळातलं संपूर्ण वस्तुमान हे अदृश्यपणे परस्परांशी जोडलेले आहेत, ज्याला ढोबळ मनाने आपण गुरुत्वाकर्षण म्हणू शकतो. पण या गुरुत्वाकर्षण संकल्पनेला अधिक एक्सटेंड केलं तर या बांधलेपणाला आपण *नातं* ही संज्ञा देऊ शकतो आणि मग आपोआपच नात्यामधला समतोलपणा, बॅलन्सिंग, एकमेकांना धरून राहण्याची, सुरक्षिततेची, न कोसळण्याची जी अपेक्षित भावना आहे ती अधिक दृढ होते.
कुणी कुणाचे नाही म्हणती
तर मग जगतो कोणासाठी
सहजपणे गुंफीत जाण्या
नात्यामधल्या रेशीमगाठी

राधिका भांडारकर

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा