You are currently viewing सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे 30 जुलै रोजी पारितोषिक वितरण…

सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे 30 जुलै रोजी पारितोषिक वितरण…

कणकवली

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षाचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी सकाळी 10.30 वा मराठा समाज हॉल (कुडाळ हायस्कूलच्या बाजूला), कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा रविवार 5 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत जिल्हा भरातून 7542 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे हे 6 वे वर्ष होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 23 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली .
या परीक्षेतील प्रत्येक इयत्तेतील जिल्हास्तरीय पहिल्या 50 गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह,मेडेल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे .6वी व 7 वी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉप व २/३/४ थी च्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क श्री सुशांत मर्गज (९४२०२०६३२६)
परीक्षा प्रमुख सिंधुरत्न टॅलेंट सर्च यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सौ संजना संदेश सावंत अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान तथा माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग व संदेश उर्फ गोट्या सावंत संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान यांनी केले आहे. पुढील शैक्षणिक वर्षात युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च ही परीक्षा रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली असून फॉर्म वितरण सुरू करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा