*मनमंथन साहित्य समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री माया कारगिरवार लिखित अप्रतिम बाल कथा*
*“संगणकाशी मैत्री“*
नमस्कार बालमित्रांनो ,
आज आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत विज्ञान युगातील .मी सौ. माया कारगिरवार ही गोष्ट सांगत आहे .
मुलांनो आजचं युग हे विज्ञानयुग समजले जाते.माणसाच्या विकासाच्या वाटचालीत त्याने नवनवीन शोध लावले. विमान,बस.रेल्वे,या दळणवळणाच्या साधनात तर आमुलाग्र बदल झालेत.तसेच शैक्षणिक ,कृषी ,समाजोपयोगी पडणार्या साधनांमधे वाढ झाली.उपयुक्त अशा निरनिराळ्या यंत्रांची निर्मिती होऊ लागली . विज्ञान जसजसं प्रगत होत गेलं तसतसं जगही जवळ यायला लागले. अगदी स्वयंपाकघरातील साहित्यापासून तर कृषी साधनांपर्यत निरनिराळ्या यंत्रसामुग्रीने मानवी जीवनात प्रवेश केला. टेलिफोन,पेजर,मोबाईल,संगणक(कॅंम्प्युटर), टि.वी, लॅपटाॅप, टॅब, हेडफोन,आणिआज तर अलेक्सा या यंत्रापर्यंत मानवाने प्रगती केली आहे.त्यामुळे माणसाची जीवनावश्यक कामे भराभर होऊ लागली..आणि माणूस विकासाच्या दिशेने खुपच प्रगत होऊ लागला…
तर मुलांनो ,मी आज तुम्हाला अशा एका आजीआजोबांची कथा सांगणार आहे ..ते सुशिक्षीत आहेत.पण खेडेगावात राहातात.त्यांच्या गावात घराघरात टि.वी. पोहचला आहे बरं का…! आजी आजोबांकडेही टि.वी.आहे….बदलत्या काळाशी त्यांनी छान स्वतःला जोडून घेतलंय….तर ऐकू या “*संगणकाशी मैत्री*…
अहो. .! ऐकलंत काय ..? मी काय म्हणते …आज “गुडीपाडवा “आहे .
मग काय विचार आहे. …?…आजोबा..!
आजी म्हणते ….चार पाच दिवसांनी शेखर,चित्रा,आणि आपली नातवंड …सुमी आणि सुयश पण येत आहे……
घर कसं गोकुळ होईल आपलं ….!
हो गं….माहित आहे.,पण काय करायचं ते तर सांगशील….? …..आजोबा. बोलले…
मी बोलले तर तुम्ही रागावणार तर नाही ना ….!
अगं बोल तर अगोदर ….!!…..आजोबा….!
आपलं गाव खेडं आहे .मुलगा ,सून, नातवंड,एक महिना राहणार आहेत…ती शहरात राहणारी मंडळी.इथे त्यांना करमायला नको कां ….?
तेव्हा म्हंटलं आपण त्यांना सरप्राईज देऊ या….!
आपल्याकडे टि. वी.,मोबाईल आहेच,आता आपण कॅम्प्युटर म्हणजे संगणक घेऊ या ….!सुमी आणि सुयश खुप आनंदी होतील…
काय ..? अगं ! ते एक महिना राहणार आहेत. नंतर आपण दोघंच ….! आपल्याला कॅम्प्युटरचं काय काम ? ….आजोबा….!
अहो मी शिकेन की …!मला आवड आहे ,नवीन जगाची ओळख करून घ्यायची….तुम्ही नाही का मला मोबाईल कसा वापरायचा हे शिकवलंत ना…!तसंच हे पण शिकेन …!
आज “गुडीपाडव्याचा चांगला मुहुर्त आहे, चला ना घेऊच ..आज…! मग काय आजोबा आजींच्या घरात कॅंम्प्युटर म्हणजे नवीन युगातला संगणकआला..आजीचा उत्साह गगनात मावत नव्हता .आजी आता नातवंडांची आतुरतेने वाट पाहू लागल्या.आणि तो दिवस उजाडला…
सकाळी सकाळी सुमी आणि सुयश “आऽजीऽऽ आऽजीऽआम्ही आऽलोय ..! असे ओरडतच घरात शिरले….सर्वांनी आजी आजोबांना नमस्कारकेला .आजीनेही सर्वांना जवळ घेतले ..नातवंडांचे लाड केले …..सुयशबोलतो….आजी आमच्यासाठी काय नवीन आणलं आहेस…? सुमीही विचारते ….आजी मला पण हं ..!
अरे हो ऽहोऽ..जऽरा धीर धरा ….!
मी तुम्हा सर्वांसाठीच एक सरप्राईज गिफ्ट आणले आहे ……तुम्हाला आवडेल असं ….!
आज्जीऽऽदाखव ना …ऽऽ!लवकर ….!
आजी आजोबा सगळ्यांना घेऊन संगणक ठेवला असतो तिथे जातात…आणि संगणकावर झाकलेलं कापड बाजूला करतात,…
ते बघीतल्यावर. वाॅव …!!!! कॅंम्प्युटर…!!! सगळेच एका सुरात ओरडतात…
बाबा कॅंम्प्युटरला मराठीत संगणक म्हणतात ना..?
होय बाळा ..!खुपखुप मज्जा येईल मुलांनोआता …त्याचे बाबा बोलतात….
सुयश त्याच्या बाबांना विचारतो….अहो बाबा या संगणकाचा उपयोग कशा कशासाठी होतो ते सांगाना बाबा. आम्हाला….!
तेवढ्यात चित्रा म्हणाली …..मज्जा आहे बुवा सुमी आणि सुयशची….वा.!वा!! मस्तपैकी नवीन मित्र मिळाल दोघांनाही ….वा !
या बाळांनो मी तुम्हाला संगणकाविषयी सविस्तर माहिती सांगतो ……सुयशचे बाबा बोलतात…!
तर या संगणकावर तुम्ही निरनिराळे गेम्स खेळू शकता,तुमच्या आवडीने निरमिराळे कार्टून्स बघू शकता,शिवाय तुमच्या अभ्यासक्रमात असलेल्या कविता ,गाणी ,ही ऐकू शकता …ती तुम्ही चित्ररूपात बघू शकता ……आणि हो……,!एवढेच नाही तर आपण त्याला इंटरनेट जोडले की जगात कुठेही आपल्याला निरोप किंवा संदेश पाठवतां येतो ….,,आपण सातासमुद्रापलीकडील माणसांशी बोलू शकतो….,त्यांना बघताही येते आपल्याला……
आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणून हा संगणक आपल्या घरात आला आहे .आपल्याला संगणकावर आपले बॅंकेचे व्यवहार देखील बॅंकेत न जाता घरूनच करता येतात.बरं कां ….!! शिवाय मुलांना,आपल्याला बाहेरगावी जायचे असल्यास बस,रेल्वे,विमानसेवा ,यांचे आरक्षणही घरूनच करता येते…आपल्याला आवडणार्या खेळांच्या स्पर्धांचे प्रक्षेपणही आपण घरी बसून पाहू शकतो…या संगणकामुळे आपल्याला संपुर्ण जगाची माहिती मिळते…..ज्ञानाचा खजिनाच गवसला आहे आपल्याला….म्हणूनच माणसाने संगणकाशी घट्ट मैत्री केली आहे.
बाबा मी पण याच्याशी मैत्री कर्णधार..,मला आवडला हा मित्र ….सुयश बोलते…..
हो…हो…मला पण आवडेल त्याच्याशी मैत्री करायला….”संगणकाशी मैत्री….ज्ञानाची खात्री…”हो ना आजोबा…?…सुमी….!
आजी आजोबा तुम्ही आम्हाला खुप आवडता….आम्ही नेहमी आता गावाला येणार सुटीत …..
मुलांचा आनंद बघून आजीआजोबांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावलेत ………
तर बालमित्रांनो कशी वाटली ही विज्ञान युगातील कथा …?आवडली असेल तर नक्की कळवा ….!
धन्यवाद
सौ. माया कारगिरवार
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-