You are currently viewing आनंद मेस्त्री यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड.

आनंद मेस्त्री यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड.

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील वाडोस येथील रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य,सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ सिंधुदुर्ग अध्यक्ष तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग तालुकाध्यक्ष आनंद मेस्त्री यांचे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

निवड महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत करण्यात आली.ग्राहकाची होणारी फसवणूक आणि त्याबाबत ग्राहकांना त्यांच्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मिळालेले अधिकार याबाबत जिल्हास्तरावर जनजागृती कार्यक्रमातही यांचा सहभाग असतो.
यांच्या विविध संघटनावर काम करण्याचे अनुभव बद्दल त्यांचे समाजातील अनेक हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा