You are currently viewing वालावल येथे झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान

वालावल येथे झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान

प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी

रुपेश पावसकर आणि कृष्णा धुरी यांच्याकडून तात्काळ १०,००० रुपयांची मदत सुपूर्द

 

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील वालावल घोंगडे वाडीतील श्री. शेखर हळदणकर यांच्या घरावर आज सायंकाळी झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे हळदणकर यांच्या घरावर झाड कोसळले. तसेच भिंत कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच ओबीसी सेल जिल्हा प्रमुख श्री. रुपेश पावसकर आणि उपतालुकाप्रमुख श्री. कृष्णा धुरी यांनी आज दिवसभर धो – धो पाऊस कोसळत असताना देखील तब्बल १ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या घराजवळ अंधारात चालत जाऊन घराची पाहणी केली आणि मदत दिली. त्याबद्दल हळदणकर कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानत अशाच कार्यकर्त्यांची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्या घरात त्यांची बायको मुलं व आई राहतात. भविष्यात त्यांच्या घरावर अशाच प्रकारे अपघात घडून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी, तात्काळ तहसीलदार कुडाळ आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे. कुडाळ मालवण चे आमदार वैभव नाईक लवकरच हळदणकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. याप्रसंगी रुपेश पावसकर ( ओबीसी सेल जिल्हाप्रमुख ), कृष्णा धुरी ( उपतालुकाप्रमुख ) आणि शिवसेनेच्या वतीने हळदणकर कुटुंबीयांना तात्काळ १०,०००/ रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली.

कुडाळ प्रतिनिधी

प्रतिक्रिया व्यक्त करा