You are currently viewing उद्या सावंतवाडीत कोमसापच्या वतीने ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रमाचे आयोजन

उद्या सावंतवाडीत कोमसापच्या वतीने ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रमाचे आयोजन

सावंतवाडी :

 

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व माजगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्याची मिरगवणी हा उपक्रम यंदा माजगाव प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे उद्या बुधवारी १९ जुलै रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. साहित्याची मिरगवणी हा उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा गेल्या वर्षीपासून राबवत आहे हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, कोमसाप चे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, मुख्याधिकारी सागर साळुंखे आधी उपस्थित राहणार आहेत.

मिरगावणी साहित्याची उपक्रमामध्ये साहित्यिक आणि शेती उपक्रम आणि त्याचबरोबर दुसऱ्या सत्रात कथा कविता कादंबरी ललित लेख एकांकिका मालवणी बोली भाषेत ओव्या, गीत या माध्यमातून साहित्याची पावसाळी मिरगवणी चा अनुभव घेता येणार आहे. जवळपास ३० हून अधिक साहित्यिकांनी यात सहभाग दर्शवला आहे. कथावर्षी निरवडे येथे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर यंदाच्या दुसऱ्या वर्षी माजगाव येथे साहित्याची मिरगवणी हा उपक्रम घेतला जाणार आहे. साहित्य चळवळ आणि मराठी भाषा व मालवणी बोली भाषा टिकावी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोलीभाषेतील गीत ओव्या या लोप होत चालले आहेत, त्या पुन्हा गुणगुणता याव्यात आणि त्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्याची मिरगवणी हा जिल्हास्तरीय उपक्रम राबवण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण आणि सरपंच अर्चना सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा