You are currently viewing मोदी @९ अभियानात निलेश राणे यांच्या नेतृत्वात कुडाळ-मालवण राज्यात द्वितीय

मोदी @९ अभियानात निलेश राणे यांच्या नेतृत्वात कुडाळ-मालवण राज्यात द्वितीय

मालवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर “मोदी@९” अभियान संपन्न होत आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या अभियानात कोकण प्रांतातून मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे भाजप प्रभारी निलेश राणे यांच्या नेतृत्वात आघाडी घेतली आहे. कुडाळ मालवण मतदार संघ या अभियानात राज्यात द्वितीय क्रमांकावर असून पक्षाने दिलेले सर्व उपक्रम निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त सहभागातून यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. अशी माहिती भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

मोदी@९ या अभियाना अंतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या विकास योजनांची माहिती, देशपातळीवर घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती घराघरात पोहोचवण्यात येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमताने भाजपाची सत्ता यावी आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून यशस्वी ठरलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी प्रत्येक मतदार संघात प्रभारी नियुक्त करण्यात आले असून मतदार संघात मोदी @ ९ चे सर्व उपक्रम त्यांच्या देखरेखीखाली करण्याच्या सूचना राष्ट्रीय स्तरावरून देण्यात आल्या आहेत. या अभियानात झालेल्या कामाची ऑनलाईन नोंद केली जात असून या कामावर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांसह स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेऊन आहेत.

कुडाळ मालवण मतदार संघाची जबाबदारी माजी खासदार निलेश राणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पक्ष स्तरावरून राबवण्यात येणाऱ्या सर्वच उपक्रमात आघाडीवर राहणाऱ्या या मतदारसंघात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिने झंझावात दिसून येत आहे. मतदार संघात मोदी @९ अंतर्गत सर्व कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात राबवले जात असून स्वतः निलेश राणे गावागावात जाऊन पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी तसेच जनतेशी संवाद साधून मोदींनी केलेल्या विकास कामांची माहिती देत आहेत.

एकूणच राज्य पातळीवर या अभियानात कुडाळ मालवण मतदार संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मालवण कुडाळ तालुक्यातील काही गावे डोंगरी असे असतानाही भर पावसातही सर्व ठिकाणी पोहचून प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यात आला आहे. निलेश राणे यांच्या संघटनात्मक नेतृत्वाची यशस्विता अधोरेखित झाली आहे. आगामी काळात हा मतदार संघ अग्रक्रमावर राहील हेच प्रयत्न राहणार आहेत. सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते घेत असलेली मेहनत कौतुकास पात्र आहे. सोबतच जनतेचा मिळणारा प्रतिसादही उत्स्फूर्त असल्याचे सांगण्यात आले.

निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे यश

कोणताही दिखाऊपणा न करता समर्पण भावनेतून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हे यश आहे. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ आघाडीवर असून आगामी काळात लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य देणे तसेच मोठ्या मताधिक्याने कुडाळ मालवण मतदारसंघात विजय हेच प्रमुख लक्ष असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा