सावंतवाडी:
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ६८ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी व दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी पुरूषोत्तम मेस्त्री यांना वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्यात आली.
माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, सुजित कोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.